Sanjay Raut News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: "आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भाजप शिल्लक नसेल"; राऊतांचा फडणवीसांना इशारा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आमच्या हातात ईडी-सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला आहे. फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. (BJP wont be left when ED CBI comes into our hands sanjay raut warning to devendra fadnavis)

राऊत म्हणाले, "ज्या दिवशी आमच्या हातामध्ये केंद्रात ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावं, त्यावेळी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नसेल. लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहितीए. त्यांनाच माहितीए असं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या दिवशी आमच्या हातात ईडी-सीबीआयसह सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा" (Latest Marathi News)

फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, "हे बिनपरिवाराचे आहेत का? यांना पोरंबाळं झाली नाहीत का? का दुसऱ्यांची पळवली आहेत. भाजप हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरं नाहीत त्यामुळं ते आमची पोरं फोडून घेऊन बसले आहेत. त्यामुळं त्यांनी स्वतःच्या पोरांचे पाळणे हालवायला पाहिजेत, दुसऱ्यांच्या पोरांचे नाही, नाहीतर ते पुन्हा पळून जातील" (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT