aashish shelar and devendra fadanvis aashish shelar and devendra fadanvis
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘मेगा प्लॅन’, पक्षात हालचालींना वेग

पक्षाचे नेते घेणार २२५ सभा ; ८० कोटी लोकांपर्यंत पोहचणार

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्ष उरले असतानाच ही निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘मेगा प्लॅन’ आखला असून, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे तब्बल २२५ नेते देशभरात सभांचा धुरळा उडविणार आहेत. सर्व मतदारसंघातील सुमारे ८० कोटी लोकांपर्यंत पोचून मोदी सरकारच्या कामाचा गजर करण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. मोदी यांच्या करिष्यावर भाजप निवडणुकांना सामोरे जाणार असल्याने स्पष्ट आहे. (Latest Marathi News)

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या काळातील काम लोकांपुढे मांडण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत. त्यातून पुढील निवडणुकांच्या प्रचारालाही सुरवात केली जात आहे. सरकारच्या कामांना लोकांपुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या अभियानाची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद तावडे यांनी दिली.(Latest Marathi News)

तावडे म्हणाले, ‘‘या अभियानातून लोकांना समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी मोदी यांच्या १२ सभा होतील. त्याशिवाय पक्षातील २२७ वरिष्ठ नेते सभा घेऊन सरकारची कामगिरी मांडणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात हे अभियान होईल’’.  (Latest Marathi News)

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षबांधणी, नियुक्त्या आणि इतर गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येत आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT