Aaditya Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray : भाजपची तुम्हाला ऑफर, पण दादा अन् शिंदेंमुळे नाकारली? आदित्य ठाकरे म्हणाले...

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत गेल्यामुळे राज्याच्या राजकारणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार अजुनही भाजपसोबत जाण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येत असलं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील गुप्त भेटीमुळे राजकारण तापलं आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाला भाजपसोबत जाण्याची ऑफर असल्याचा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

तुम्हालाही भाजपची ऑफर आहे, मात्र अजितदादा आणि एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही जात नाहीत, असा प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे म्हणाले की, मी कधीही ऑफरच्या राजकारणाला महत्त्व देत नाही. मुंबईत येणाऱ्या काळात इंडियाची बैठक होणार आहे. जे देशासाठी लढत आहेत, ते एकत्र आले आहेत. हुकूमशाही सरकारला हाकलून लावायचं असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य पुढं म्हणाले की, 'सामना'मध्ये पक्षाची भूमिका मांडलेली आहे. सध्याचं राजकारणा लढा प्रामाणिक, एकनिष्ठ आणि दुसऱ्या बाजुला भ्रष्टाचारी लोक तसेच स्वार्थी लोक आहेत. आता लोकांनाच ठरवायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Timber Transport Bribe : सागवान वाहतुकीसाठी लाच; तिघे जाळ्यात कंत्राटी संगणक ऑपरेटरला रंगेहात पकडले; जुन्या घराच्या लाकडासाठी मागितले पैसे

WCL Officer Bribe Case : बिलासाठी मागितली ५० हजारांची लाच डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या जाळ्यात

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार पडळकर, खाडेंसह ६४ अर्ज दाखल; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Sangli Crime : सांगली हादरली! गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार; 'शिवप्रतिष्ठान युवा'च्या तत्परतेने इम्रानवर गुन्हा, आणखी 20 महिला जाळ्यात अडकल्याचा दावा

SCROLL FOR NEXT