rajesh tope rajesh tope
महाराष्ट्र बातम्या

ब्लॅक लिस्टेड कंपनी आरोग्य विभागाचा विषय नाही - राजेश टोपे

३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग (Health dept) आणि (शिक्षक पात्रता परीक्षा) टीईटीची परीक्षा (TET Exam) एकत्र आल्या आहेत.

रश्मी पुराणिक

मुंबई: पुढच्या महिन्यात ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग (Health dept) आणि (शिक्षक पात्रता परीक्षा) टीईटीची परीक्षा (TET Exam) एकत्र आल्या आहेत. या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री (health minister) राजेश टोपे (rajesh tope) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "मी याबाबत वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे, त्यामुळे त्यांनी टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करावा अशी विनंती केली आहे"

"मार्ग काढू. मुलांचं नुकसान अजिबात होऊ नये. मी याबाबत शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे. अजून एक महिना आहे, यातून मार्ग काढला जाईल, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल" असे राजेश टोपे म्हणाले.

न्यासाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, "कंपनी ब्लॅकलिस्टेट आहे किंवा नाहीय हा आरोग्य विभागाचा विषय नाही. हा आयटी खात्याचा विषय आहे" राज्यात चार ऑक्टोबरला शाळा तर ७ ऑक्टोबरला मंदिर सुरु होणार आहेत. त्यासंदर्भातील प्रश्नावर राजेश टोपे यांनी आरोग्य विभाग एसओपी देईल. खूप गर्दी होऊ नये आणि संक्रमणाची स्थिती निर्माण होऊ नये अशा पद्धतीची एसओपी असेल"

पावसाच्या मुद्यावर म्हणाले....

जूनपासून आतापर्यंत ३ ते ४ वेळा जोरदार पाऊस झाला. कालही जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिलेत. ५ ते ७ दिवसात पंचनामे पूर्ण गेले जावेत अशा सूचना मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत. कालच्या पावसात पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT