blind.jpg 
महाराष्ट्र बातम्या

शिक्षण, आरोग्य अन्‌ मनोरंजनात "ते' वरचढ 

किशोरी वाघ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : २०११ च्या जनगणनेनुसार शहरात अंधाची संख्या २३ हजारांहून अधिक आहे. आजुबाजूला घडणाऱ्या घटना दिसत नसल्या तरीही शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, क्रीडा, संशोधन क्षेत्रासह इतर क्षेत्रांत ते वरचढ ठरत आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड युनिट महाराष्ट्र यांच्यातर्फे शाळा, कॉलेज, कार्यशाळांमध्ये अंधांना मार्गदर्शन केले जात आहे. या संस्थेच्या प्रयत्नामुळे सरकारने बीएड शिक्षणक्रम मराठीत अंध व्यक्तींसाठी सुरू केल्यामुळे २२ विद्यार्थ्यांनी नाशिकमधून पदवी प्राप्त केली आहे. 

दृष्टीबाधितांनी कतृत्वातून विविध क्षेत्रात मिळविलेय यश

भारतात दहा जिल्हाधिकारी पदावर दृष्टीबाधित व्यक्‍ती कार्यरत असून महाराष्ट्रातील एक महिलापद भूषवत आहे. तसेच, महाराष्ट्रातील २८ अंध व्यक्ती ज्या विविध क्षेत्रात आपली कामगिरी चोख बजावत आहेत, त्यात नाशिकमधील ३ व्यक्तीचा समावेश आहे. नाशिकमधील के . जे. मेहता, एसएमआरके, एचपीटी, केटीएचएम या महाविद्यालयात उचशिक्षण घेणारे अंध विद्यार्थी उज्वल आयुष्याचे स्वप्न बघत आहे. पहिली ते दहावी शिक्षणानंतर पुढे काय करावे यासंदर्भात नेहमीच प्रश्नचिन्ह असते. त्यामुळे कौशल्यावर आधारित शिक्षण सुविधा पुरवण्यावर सरकारने भर दिला पाहिजे. अंध व्यक्तीच्या विकासासाठी नुसती सहानुभूती न दाखवता समान अधिकार व हक्क दिले तर नक्कीच ते सर्व क्षेत्रात डोळस व्यक्तिप्रमाणे आयुष्य जगू शकता. 
 
प्रतिक्रिया 
जन्मजात अंधत्व हे काही जनुकीय कारणामुळे, डोळ्यांच्या बुबुळची व नसाची वाढ न झाल्याने जरी येत असले, तरी शहरात मधुमेह व रक्तदाबामुळेदेखील अंधत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. साधारणत: चाळीशीनंतर नेत्रपटलाचे विकार वाढतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील याची काळजी घ्यावी. पालकांनी लहान मुलाची वेळोवेळी नेत्र तपासणी करणे आवश्‍यक आहे.-डॉ.मनीष बापये, नेत्रपटल विकार तज्ञ 
 
अंध व्यक्तींना समाजात वावरतांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. रस्ता ओलांडतांना किंवा प्रवासात कधी कधी गाडीचा अंदाज न आल्याने सदस्या उद्भवते. त्यामुळे पांढऱ्या काठीला सायरन असावे आणि ते अनुदानात उपलब्ध करून द्यावे. अंध व्यक्तीचा तिरस्कार करणारेदेखील काही लोक असतात, त्यांनी एक माणूस म्हणून अंध व्यक्तींना समान वागणूक द्यावी. - शंकर साळवे, अंध व्यक्ती 

लोकांमध्ये दृष्टीबाधित व्यक्तीबाबत जनजागृती आवश्‍यक आहे. तेदेखील समान अधिकार व समान वागणूक मिळवण्यास पात्र आहेत. फक्त सहानुभूती न दाखवता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे. लवकरच आमच्या संस्थेकडून शहरात अंध व अपंग व्यक्तींना आवश्‍यक असलेली साधनसंपत्तीचे संग्रहालय येत्या एक ते दीड वर्षात उभारले जाणार आहे. यातून लोकांना प्रबोधन केले जाणार आहे. - मुक्तेश्वर मुनशेट्टीवार,नॅब संस्थेचे महाराष्ट्राचे सहसचिव. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT