BMC Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

BMC Election: "ठरलं! मुंबईत भाजपचा महापौर, शिंदे-RPI ला अडीच-अडीच वर्ष उपमहापौर पद"

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमी ठाकरे विरुद्ध भाजप-शिंदे असा सामना

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-भाजप युतीने चांगलीच तयारी केल्याचं दिसून येत आहे. अशातच आता भाजपसोबत युतीत असणाऱ्या एका पक्षाने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा दावा केला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘भाजप RPI शिवसेना’ महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि RPIचा उपमहापौर होईल. 5 वर्षात पहिला अडीच वर्ष उपमहापौर RPIचा आणि दुसऱ्या टर्मममध्ये उपमहापौर शिवसेनेचा होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना RPIच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे. भाजप शिवसेनेने RPIच्या उमेदवारांनाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रामदास आठवले यांनी बोलताना केलं आहे. मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात बोलताना रामदास आठवले यांनी हा दावा केला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी 5 वर्षात पहिला उपमहापौर आरपीआयचाच होईल असं आश्वासन केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मित्र धर्म पाळणारे आदर्श नेते आहेत असे सांगत आशिष शेलार यांनी रामदास आठवले यांच्यावर कविता देखील केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT