milind deora Sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबई महापालिकेची प्रभागरचना रद्द करा; काँग्रेस नेते फडणवीसांच्या भेटीला

फक्त एका पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग रचनेत बदल करणे योग्य नसून ते घटनेच्या विरोधात आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहेत. राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते फडणवीसांना भेटले आहेत. तर मुंबई महापालिकेची प्रभाग रचना बदलण्यात यावी अशी मागणी त्यांनी फडणवीसांकडे केली आहे.

मुंबईतील महापालिकेच्या निवडणुका निष्पक्षपणे पार पडायला हव्यात. फक्त एका पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग रचनेत बदल करणे योग्य नसून ते घटनेच्या विरोधात आहे. मुंबईत जाहीर झालेल्या प्रभाग रचना रद्द कराव्यात यासंदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी आमच्यासोबत महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा हेही उपस्थित होते अशी माहिती मिलिंद देवरा यांनी दिली.

दरम्यान, कोर्टाने निर्णय दिल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या प्रभाग रचना सुद्धा जाहीर करण्यात आल्या होत्या. या प्रभाग रचनेत अन्याय झाला असून नवी प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी देवरा यांनी केली आहे. या प्रभाग रचनेत कुणाचा फायदा आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे यासंदर्भात जास्त बोलण्याची गरज नाही असंही देवरा म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT