BMC Election  esakal
महाराष्ट्र बातम्या

BMC Election : शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर; तातडीने बोलावली बैठक

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक चांगलीच गाजणार आहे.

धनश्री ओतारी

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक चांगलीच गाजणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहे. यापार्श्वभूमिवर शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात तातडीने शिवसेनेने बैठक बोलावली आहे.(BMC Election Uddhav Thackeray called a meeting of all department heads of shivsena)

शिवसेनेपक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर शिवसेना विभागप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईतील सर्व विभागप्रमुख आणि विभाग महिला संघटक या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

एकिकडे मुंबई महापालिकेतील 150 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक असणार असा निर्धार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला होता. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील 150 चे टार्गेट येथील पदाधिकारी आणि आमदारांना दिले आहे. एवढेच नाहीतर पुढचा महापौर हा भाजपचाच असावा अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या आहेत.

त्यामुळे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे. खासदार अरविंद सावंत, सुनील राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भास्कर जाधव तसेच मुंबईतील विभागप्रमुख आणि महिला संघटक या बैठकीसाठी उपस्थित आहेत. तर शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर भास्कर जाधव पहिल्यांदाज उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने देखील कंबर कसल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT