Jayant Patil
Jayant Patil 
महाराष्ट्र

श्रीनिवास जाधव यांचे प्रसंगावधान अन्‌ जयंत पाटलांची तत्परता 

संजय मिस्कीन

मुंबई - समुद्राला आलेले उधाण... त्यामध्ये बुडणारी बोट... अन्‌ त्यामुळे उडालेला थरकाप... कुणालाच काही सुचत नव्हते; मात्र यातूनही सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांनी प्रसंगावधान आणि धीरोदात्तपणा दाखवला. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची पीएनपी ही प्रवासी वाहतूक करणारी कंपनी आहे याबाबत त्यांना माहिती होती. त्यामुळे तातडीने मदत मिळेल हे ओळखून जाधव यांनी पाटील यांना फोन केला. जाधव यांचे प्रसंगावधान आणि पाटील यांच्या तत्परतेमुळेच बोटीतील प्रवाशांचे प्राण वाचू शकले. 

शिवस्मारकाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या या स्पीड बोटीत 25 जण होते. ही बोट एका खडकाला धडकून फुटली आणि बुडू लागली. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे सर्व अधिकारी, कार्यकर्ते गांगरले होते. श्रीनिवास जाधव यांनी या प्रसंगातही धीर सोडला नाही. त्यांनी आमदार जयंत पाटील यांना फोन केला, तेव्हा ते अलिबागच्या कार्यालयात होते. जाधव यांनी त्यांना बोट बिघडल्याचे सांगितले. त्यावर पाटील यांनी लगेच दुसरी बोट पाठवतो असा निरोप दिला, पण दोन मिनिटांत परत जाधव यांनी पाटील यांना फोन केला.

"बोट बुडू लागली आहे, तातडीने मदत पाठवा अन्यथा काही खरे नाही,' असे त्यांनी सांगितले. पाटील यांनी गांभीर्य ओळखले. त्यांची स्वत:ची स्पीड बोट "गेट वे ऑफ इंडिया'च्या परिसरात होती. त्यांनी लगेच बोटचालकाला फोन केला आणि सर्व माहिती दिली. बोटचालकाला आधीच माहिती मिळाल्याने ते सतर्क झाले होते. मालकांचा निरोप ऐकताच त्यांनी थेट बोट अपघातस्थळी नेली. काही मिनिटांतच सुटका करणारी बोट घटनास्थळी दाखल झाली आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्याच वेळी सुरक्षारक्षकांचे हेलिकॉप्टरही सुटकेसाठी अवकाशात झेपावले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT