उच्च न्यायालय 
महाराष्ट्र बातम्या

परभणीच्या युवकाला जामीन मंजूर, इसिसचा हस्तक असल्याचा आरोप

सुनिता महामुनकर

मुंबई : इसिस (Isis) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा हस्तक असल्याचा आरोप असलेल्या परभणी येथील युवक इकबाल अहमद कबीर अहमदला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज सशर्त जामीन मंजूर केला. अहमदला एनआयएने (NIA) ऑगस्ट २०१६ मध्ये अटक केली होती. मात्र अद्याप चार वर्षे उलटून झाली तरी खटला सुरू झाला नाही आणि अभियोग पक्षाने सुमारे दीडशे साक्षीदारांची यादी दिली आहे. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्याने केली होती. राज्य सरकारने या जामिनाला विरोध केला होता. न्या. एस.एस.शिंदे आणि न्या.एन.जे.जमादार यांच्या खंडपीठाने आज यावर निकाल जाहीर केला. अहमदला न्यायालयाने एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.

तसेच पारपत्र एनआयएकडे जमा करावे, एनआयए न्यायालय क्षेत्राबाहेर जाऊ नये, तपासात सहकार्य करावे, चौकशीला हजर राहवे असे आदेश दिले आहेत. खटले प्रलंबित असल्यामुळे आरोपींना कारागृहात खितपत रहावे लागते. त्याची कारणे काही असली तरी त्यामुळे आरोपी कारागृहात वर्षोनुवर्षे राहतात, असे मत या सुनावणीमध्ये यापूर्वी न्यायालयाने व्यक्त केली होती. औरंगाबाद येथील एटीएस युनिटवर हल्ला करण्याचा कट परभणी मौडेल या नावाने करण्यात आला होता. यामध्ये एटीएसने आणखी दोघांना अटक केली आहे. एटीएसकडून हा तपास एनआयएकडे वर्ग झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT