महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava : शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा अधिकार BMC कडून शिवसेनेने पुर्णपणे गमावला

दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

दसरा मेळाव्याच्या शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिवसेनेकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा कोणताही अधिकार नाही, हे पटवून देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पालिकेचा युक्तिवाद पाहता शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा अधिकार पालिकेकडून शिवसेनेने पुर्णपणे गमावला असल्याचे सांगण्यात येत आहे. (bombay high court hearing on shiv senas plea for permission to hold dasara melava shivaji park )

महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली. आज ठाकरे गट, शिंदे गट, महापालिका यांच्याकडून बाजू मांडण्यात आली. यावेळी युक्तिवादादरम्यान पालिका त्यांच्या निर्णयावर ठाम राहिली. पालिकेच्या वकीलांनी शिवसेनेचे यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे युक्तिवाद केला, त्यामुळे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा अधिकार शिवसेनेने गमावला आहे, असे पालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी सांगितले.

पालिकेचा युक्तिवाद नेमका काय?

शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे. ते शांतता क्षेत्रात मोडतं. अर्ज कायद्याला अनुसरुनच फेटाळण्यात आला आहे. मेळाव्यातून सेना कुणाची हे सिद्ध होणार नाही. मेळावा झाल्यास कायद्याचा प्रश्न उद्भवेल. आम्ही कुणीचीही बाजू न घेता दोघांनाही परवानगी नाकारली आहे.

तुमच्या एकत्र येण्यावर आणि भाषणावर गदा आणलेली नाही. त्याच जागेवर मेळावा घ्यायचाय आणि तो अधिकार आहे असा दावा करता येणार नाही. २०१२ मध्ये हे प्रकरण कोर्टात आलं तेव्हा अन्य पर्याय नसल्याने परवानगी देण्यात आली होती. आणि त्यावेळी पुढच्या वर्षी हे मैदान उपलब्ध नसेल तर अन्य मैदानासाठी अर्ज करू अशी कबुली शिवसेनेने दिली होती. कुणी कायमचा हक्क सांगु शकत नाही. २०१४ साली आचारसहिंतेचा मुद्दा होता. अर्जाच्या छाननीबाबत पालिकेनं नियम स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारनं साल 2016 सालच्या आदेशात जे 45 दिवस राखीव आहेत ते स्पष्ट केलेले आहेत. त्यात केवळ बालमोहन यांनाच बालदिन शिवाजी पार्कात परवानगा नावानिशी दिलेली आहे. बाकीच्या केवळ दिवसांचा उल्लेख आहे. दसऱ्याचा दिवस हा दसरा मेळाव्यासाठी राखीव आहे. मात्र तो कोणी घ्यावा हे आदेशात म्हटलेलं नाही, असंही साठे यांनी म्हटलं आहे.

तसेच आम्ही दोन्ही गटाकडून करण्यात आलेल्या अर्जाच्या निर्णयासंदर्भात वेळकाढूपणा केलेला नाही. दोघांच्या अर्जाचा छाननी केली. दोन्ही गटात वाद असल्याने निर्णय थेट घेता येत नाहीत. असेही पालिकेने यावेळी स्पष्ट केलं.

शिवसेनेचा युक्तिवाद

मुळ शिवसेना कुणाची हा मुद्या येथे नाही,दरवर्षी शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर होतो, ही परंपरा थांबवणे योग्य नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. तसेच, 2016 पासून आम्हाला परवानगी, मग कुणीही उठून अर्ज कसा करतोय असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या चिनॉय यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT