Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal News : भुजबळांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! बेनामी संपत्ती संदर्भातील ४ तक्रारी केल्या रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ कुटुंबीयांना उच्च न्यायालयाने आयकर विभागाने बेनामी अपसंपदा संदर्भात केलेल्या ४ तक्रारी रद्द केल्या आहेत. छगन भुजबळ, समीर आणि पंकज भुजबळ यांच्याशी निगडीत या मालमत्ता होत्या.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेनामी प्रोहिबेशन अॅक्ट अंतर्गत तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच सप्टेंबर २०२१ मध्ये आयकर विभागाने विशेष कोर्टात तक्रारी दाखल करत मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात सल्लग्न (जप्त) केल्या होत्या.

सुमारे ४ डझन बनावट कंपन्यांच्या नावाखाली भुजबळ कुटुंबीयांनी बेनामी मालमत्ता जमा केली, असा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला होता. आयकर विभागाच्या तक्रारीच्या आधारे दंडाधिकाऱ्यांनी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी भुजबळ कुटुंबीयांविरोधात फौजदारी कारवाई सुरू केली होती.

दरम्यान भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायाधीश आर एन लढ्ढा यांच्या एक्कल पीठाने आयकर विभागाच्या या तक्रारी रद्द केल्या आहेत. २०१६ चा कायदा जुन्या प्रकरणांना लागू होत नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत हा निर्णय देण्यात आला आहे.

तक्रारी रद्द करण्यासोबतच छगन भुजबळ यांच्याविरोधात दाखल झालेला फौजदारी कारवाई देखील कोर्टाने रद्द केली. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT