RTE 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील आरटीई प्रवेशावर तब्बल एवढ्या शाळांचा बहिष्कार

सकाळवृत्तसेवा

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु या प्रवेश प्रक्रियेतंर्गत देण्यात येणारी शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारने तीन वर्षांपासून दिलेली नाही. परिणामी, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले जाणार नसल्याची भूमिका खासगी शाळा चालकांनी घेतली आहे. राज्यातील जवळपास चार हजारांहून अधिक खासगी शाळांनी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जातात. सध्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत राज्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम सरकारकडून शाळांना देण्यात येते. मात्र, या शाळांना तीन वर्षांपासून शुल्क प्रतिपूर्तीची काही रक्कम अद्याप दिलेली नाही. त्यामुळे शाळा चालविणे अवघड होत आहे. याबाबत शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, कोणतीही सकारात्मक पावले सरकारने उचलली नाहीत. त्यामुळे शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत नवीन प्रवेश घेणार नाही, अशी भूमिका घ्यावी लागत असल्याचे इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल्स असोसिएशनचे (आयईएसए) कार्याध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शालेय शिक्षण विभागाने शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडे २०० कोटींची मागणी केली आहे. मात्र वित्त विभागाने या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे शाळाच नव्हे, तर शिक्षण विभाग वित्त विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

राज्यात ‘आयईएसए’शी संलग्न जवळपास चार हजार २२८ शाळा आहेत. या सर्व शाळांसह राज्यातील अन्य शाळा आरटीई २५ टक्के प्रवेशावर बहिष्कार टाकत आहेत. सरकारने तीन वर्षांची शुल्क प्रतिपूर्ती न दिल्याने शाळांना हा निर्णय घ्यावा लागला. एकीकडे सरकार शुल्क प्रतिपूर्ती देत नाही आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा म्हणून दबाव टाकत आहे. सरकारने शाळांना वेळीच दाद न दिल्यास ‘शाळा बंद’ ठेवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील.
- राजेंद्र सिंग, कार्याध्यक्ष, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT