Ujjani Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! उजनी धरणाचे सर्व दरवाजे बंद; भीमा नदीतील विसर्ग पूर्णपणे थांबविला; आषाढी वारीत वाळवंटात नसणार पाणी

पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी वारीचा सोहळा ६ जुलैला पंढरपुरात रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून १३ ते १५ लाख भाविक पंढरपूरमध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करता यावे, वाळवंट परिसरात पाण्याचा विसर्ग जास्त राहू नये, यासाठी आता उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी पूर्णत: बंद करण्यात आले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी वारीचा सोहळा ६ जुलैला पंढरपुरात रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून १३ ते १५ लाख भाविक पंढरपूरमध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करता यावे, वाळवंट परिसरात पाण्याचा विसर्ग जास्त राहू नये, यासाठी आता उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) सकाळपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंट परिसरातील विसर्ग कमी होणार आहे.

उजनी धरण सध्या ७३ टक्क्यांपर्यंत भरले असून धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी सोडण्यात येणारे १६०० क्युसेक पाणी देखील बंद करण्यात आले आहे. ८ जुलैपर्यंत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाणार नाही, जेणेकरून आषाढी वारीचा सोहळा व्यवस्थित पार पडेल हा हेतू आहे. उजनी धरणात सध्या दौंड व स्थानिक परिसरातून १२ हजारांहून अधिक क्युसेकची आवक जमा होत आहे. पण, धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद केल्याने पुढील पाच दिवसांत धरण ९५ टक्क्यांपर्यंत भरेल, अशी स्थिती आहे. धरणात सध्या एकूण १०३ टीएमसी पाणी असून त्यात ३९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग देखील आता बंद करण्यात आला आहे.

धरणातून सोडलेले पाणी असे...

  • सीना-माढा उपसा सिंचन योजना : ८० क्युसेक

  • दहिगाव उपसा सिंचन योजना : ८० क्युसेक

  • बोगदा : ९०० क्युसेक

  • कालव्यातून सोडलेले पाणी : १५०० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा विसर्जनाच्या प्रतीक्षेत, चिंतामणीला दिला निरोप

SCROLL FOR NEXT