By breaking the law Waghini murder 
महाराष्ट्र बातम्या

कायदा मोडून वाघिणीची हत्या 

उमेश जाधव

मुंबई : यवतमाळमधील पांढरकवडा येथे "अवनी' वाघिणीची हत्या वन्यजीव कायदा मोडून करण्यात आल्याचा आरोप करत पर्यावरणवाद्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. एका वाघिणीच्या हत्येसाठी 400 वन्य कर्मचारी, दोन हत्ती, श्‍वानांची मदत का घेतली जाते, असा प्रश्‍न पर्यावरण अभ्यासक शेखर नानजकर यांनी केला. 

"अवनी'ला न मारता तिला जेरबंद करता आले असते. वन विभागाने वाघिणीला ठार करण्याच्या दृष्टीनेच कारवाई केली. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार सूर्यास्तानंतर कोणत्याही वन्यप्राण्याला बेशुद्ध किंवा ठार करता येत नाही. त्यामुळे वाघिणीला ठार करण्यासाठीच हैदराबादचा नेमबाज शफात अली खान यांचा मुलगा असगर अली खान याची नियुक्‍ती केली होती. रात्रीच्या वेळी गोळीबार करणाऱ्या असगर अली याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी का रोखले नाही, असा प्रश्‍नही नानजकर यांनी केला. 

दोन बछडे अनाथ 

सहा वर्षांच्या "अवनी'ची हत्या झाल्याने तिचे सहा ते आठ महिन्यांचे बछडे अनाथ झाले आहेत. "अवनी'ची हत्या म्हणजे या बछड्यांचीच हत्या झाल्यासारखे आहे. म्हणजेच वन विभागाने या कारवाईत एका नव्हे तर तीन वाघांची हत्या केल्याचा आरोपही नानजकर यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT