chadchan daroda

 

solapur crime

महाराष्ट्र बातम्या

चडचण दरोड्यातील ब्रेकिंग! ओझ्यामुळे दरोडेखोर पडक्या घरावर दागिने, रोकडने भरलेली बॅग टाकून पसार; दरोडेखोरांनी दरोड्यात वापरलेली कार ८ सप्टेंबरला आंधळगावातून चोरली होती

आठ दरोडेखोरांनी १५ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास लष्करी गणवेशात येऊन चडचण येथील बॅंकेवर दरोडा टाकला. तेथून ते दोन गाड्यांमधून वेगवेगळ्या दिशेने पसार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातील एकजण मंगळवेढामार्गे पळून जात असताना हुजलंजी गावाजवळ एका दुचाकीला धडकला. पण, त्याठिकाणी लोक जमा झाल्याने कार तेथेच सोडून तो तरुण पसार झाला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखेत सशस्त्र दरोडा टाकून चोरीच्या कारमधून पळालेल्या दरोडेखोराची हुलजंतीजवळ (ता. मंगळवेढा) रस्त्यालगत उभ्या दुचाकीला धडक बसली. तेथून पुढे जायला रस्ता व्यवस्थित नसल्याने कार माघारी फिरवून पळून जाताना लोक त्याठिकाणी आले. त्यावेळी हवेत गोळीबार करून पळालेल्या दरोडेखोराने एक बॅग सोबत नेली होती. अपघाताच्या ठिकाणापासून १५० मीटर अंतरावरील पडक्या घराच्या छतावर ती बॅग सापडली आहे. त्यात दागिने व रोकड असल्याचे मंगळवेढा पोलिसांनी सांगितले.

आठ दरोडेखोरांनी १५ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास लष्करी गणवेशात येऊन चडचण येथील बॅंकेवर दरोडा टाकला. तेथून ते दोन गाड्यांमधून वेगवेगळ्या दिशेने पसार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातील एकजण मंगळवेढामार्गे पळून जात असताना हुजलंजी गावाजवळ एका दुचाकीला धडकला. पण, त्याठिकाणी लोक जमा झाल्याने कार तेथेच सोडून तो तरुण पसार झाला. कारची झडती घेतल्यावर त्यात ग्राहकांनी बॅंकेत गहाण ठेवलेले सोने, ठेवीदारांची रोकड असलेली एक बॅग होती. याशिवाय बॅंकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर, लॉकर तोडण्याची साधने, चष्मा, टोपी, बुरखा असे साहित्य देखील सापडले आहे. पण, दरोडेखोरांनी बॅंकेतून सुमारे २१ कोटींची रोकड आणि अंदाजे ५० किलो सोने लुटले आहे.

त्यातील एक बॅग सापडली होती, गुरूवारी (ता. १८) आणखी एक बॅग मंगळवेढा पोलिसांना सापडली असून ती कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी दिली. पावसामुळे ओझ्याची बॅग घेऊन चालणे कठीण असल्याने आणि दरोड्याची खबर सगळीकडे पसरल्याने त्या दरोडेखोराने ती बॅग तेथे टाकली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरोडेखोरांना शोधण्यासाठी सोलापूर ग्रामीण व शहर पोलिसांनी देखील संशयितांवर पाळत ठेवली आहे.

दरोडेखोरांनी ८ तारखेला आंधळगावातून चोरली होती कार

दरोडेखोरांनी चडचणच्या सशस्त्र दरोड्यात वापरलेली कार त्यांनी ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथून चोरली होती. चंदनशिवे हे कारचे मूळ मालक असल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. कार चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आठ दिवसांनी बॅंकेवर दरोडा टाकला. कार चोरीसंदर्भात पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही पाहिले, पण त्यात भरधाव कार दिसत आहे, पण त्यातील लोकांचे चेहरे दिसत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT