लाचेच्या जाळ्यात sakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! सोलापूरच्या ‘महावितरण’मधील तिघे लाचलुचपतच्या जाळ्यात; कंत्राटी कर्मचाऱ्याने साहेबांसाठी घेतली आठ हजाराची लाच; ‘या’ दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा

पीएम सुर्यघर योजनेतून लोकांच्या घरांवर सौरउर्जा पॅनल बसवून देण्याचे काम करणाऱ्या तक्रारदाराकडून साहेबांसाठी आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कत्राटी कर्मचारी योगीनाथ म्हेत्रे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पीएम सुर्यघर योजनेतून लोकांच्या घरांवर सौरउर्जा पॅनल बसवून देण्याचे काम करणाऱ्या तक्रारदाराकडून साहेबांसाठी आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कत्राटी कर्मचारी योगीनाथ म्हेत्रे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. म्हेत्रे याने ‘महावितरण’चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरत व्हनमाने व सहाय्यक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी लाच स्विकारल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या तिघांविरूद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदाराकडे सतत लाचेची मागणी होऊ लागल्याने तक्राराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. मंगळवारी (ता. २०) कंत्राटी कर्मचारी योगीनाथ म्हेत्रे याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरत व्हनमाने यांच्यासाठी पाच हजार रुपये तर सहायक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी तीन हजार रूपयांची लाच घेतली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात तो कंत्राटी कर्मचारी आणि सहायक अभियंता सलगर हे दोघे अडकले आहेत. पण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्हनमाने रजेवर असल्याने त्यांना अटक झालेली नाही. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'महागठबंधन'मध्ये मुकेश साहनींना उपमुख्यमंत्रीपद देण्यामागं नेमकं कारण काय? काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला वगळून साहनींवर का विश्वास ठेवला?

Professor Recruitment: प्राध्यापक भरती रखडली! ९९ टक्के उमेदवार अपात्र; जाचक अटीचा फटका

'कितीही शिव्या दिल्या तरी भाजप शिवाय पर्याय नाही' शरद पोंक्षेंच वक्तव्य, महेश कोठारेंना ट्रोल करणाऱ्यांना दिलं आव्हान

Satej Patil : रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार, सतेज पाटलांचा कोणावर रोख

Rohit Sharma: 'आज फेअरवेल मॅच होती!', गौतम गंभीरच्या कमेंटवर रोहितने काय दिली रिअॅक्शन? पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT