Buddha Purnima History Sakal
महाराष्ट्र बातम्या

Buddha Purnima 2023 : महाराष्ट्रात हजारो वर्षांपूर्वी बौद्ध धर्माचा प्रसार कोणी केला?

Buddhism in Maharashtra:महाराष्ट्रात जवळपास २ हजार बुद्ध लेण्या आहेत.

डॉ. भन्ते चंद्रबोधी

Buddha Purnima 2023: आज (५ मे) बुद्ध पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने भगवान बुद्धांचे अनेक अनुयायी त्यांचं स्मरण करतात, त्यांना अभिवादन करतात. महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार तसंच बुद्ध विचारांच्या प्रचाराबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव चर्चेत येत. पण त्याही आधी हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे.

महाराष्ट्रात हजारो वर्षांपूर्वी बौद्ध धर्माचा प्रसार कोणी केला?

महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार सर्वप्रथम पुण्णस्थवीर यांनी केला आहे. तसा उल्लेख बौद्ध साहित्यातील पाली त्रिपीटक ग्रंथातील ‘सुत्तपीटक’ या ग्रंथात ‘पुण्ण सुत्त’ यात आढळतो. या पुण्णसुत्तात महाराष्ट्राचे बुद्धकाळातील नाव ‘सुनापरांत’ असे आहे.

पुण्ण भिक्खू हे तथागत बुद्धांना विनंती करतात की, मला माझ्या देशात जाऊन धम्माचा प्रसार करावयाचा आहे. मला परवानगी द्यावी. बुद्ध त्यांना परवानगी देतात.

पुण्ण भिक्खू महाराष्ट्रातील ‘नालासोपारा’ पूर्वीचे सुप्पारक येथून संपूर्ण महाराष्ट्रभर बुद्ध विचारांचा प्रसार करतात. आजही नालासोपारा येथे पूज्य भिक्खुंच्या स्मरणार्थ निर्माण केलेला स्तूप अस्तित्वात आहे.

मूळ पाली त्रिपीटकात बुद्धकाळातील महाराष्ट्राची नाळ जोडणारा पतिठ्ठाण म्हणजे आजचे पैठण येथील गोदावरीच्या तीराजवळील बावरी ब्राह्मण यांचा संदर्भ आढळतो. बावरी ब्राह्मण यांना वार्ता समजते की, बुद्ध जन्माला आले आहेत.

बावरी ३२ शुभलक्षणे व ८४ उपलक्षणांचे जाणकार असतात. ते त्यांच्या सात शिष्यांना बुद्धामध्ये ३२ शुभ लक्षण आणि ८४ उपलक्षणे आहेत का? हे जाणण्यासाठी बिहारच्या श्रावस्ती नगरीला पाठवतात.

त्यांचे सातही शिष्य बुद्धांची सुमधुर धम्मवाणी श्रवण करून तिथेच बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन बौद्ध भिक्खू होतात ते काही परत येत नाहीत, यामुळे स्वत: बावरी श्रावस्तीला जातात. बुद्धांचे ३२ शुभ लक्षणे आणि ८४ उपलक्षणे ओळखतात.

या शुभ लक्षणांनी व उपलक्षणांनी परिपूर्ण महापुरूषच बुद्ध आहेत. त्यांना पटते की जगात बुद्धांचा जन्म झाला आहे. ते बुद्ध वाणी श्रवण करतात आणि तथागत भगवान बुद्धांकडून प्रवज्जा ग्रहण करतात.

महाराष्ट्रातल्या बौद्ध लेण्या

तिसरा संदर्भ येतो सुप्रसिद्ध व अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या तिसऱ्या धम्म संगतीमध्ये की, ज्यामुळे बौद्ध धर्म जगामध्ये प्रसार होण्यास मदत झाली होती व बौद्ध धर्म भारताचा राष्ट्रधर्म झाला होता. सम्राट अशोकने तिसऱ्या धम्म संगतीचे आयोजन केले होते.

यामधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, दहा देशामध्ये अर्हंत भिक्खुंना धम्मप्रचारार्थ पाठविले होते. महाराष्ट्रात महादेवस्थवीर व धम्मरक्षीत स्थवीर यांना पाठविले हेते.

८४ हजार धर्मस्कंदाला अनुसरून ८४ हजार स्तूप, चैत्य, विहार व लेण्यांची निर्मिती सम्राट अशोकने केली. जवळपास २ हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत.

बौद्ध धर्माचा प्रचार - प्रसार

बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार बौद्ध भिक्खु संघाद्वारे केला जात असे आणि आजही केला जात आहे. वर्षावासाच्या काळात आणि अन्य काळात भिक्खुंच्या निवासासाठी अध्ययन व अध्यापनासाठी तसेच धम्मोपदेशासाठी पूर्वी पर्वतांच्या कडेकपारीचा उपयोग करीत होते.

परंतु, जसजशी भिक्खु आणि उपासक यांची संख्या वाढली तसतशी ही निसर्गनिर्मित स्थाने कमी पडू लागली तेव्हा त्या कडेकपारी पोखरून त्यांचा विस्तार करण्यात आला.

नंतर त्याचाच विकास करून सर्व सुखसोईंनी युक्त अशा लेण्यांमध्येच विहार, चैत्य, स्तूप, श्रृंगार, जातककथांची चित्रमालिका, बुद्ध जन्म व तत्त्वज्ञानाशी संबंधित चित्र, शिल्पपट कोरण्यात आले. चिनी प्रवाशांच्या वर्णनावरून भारतामध्ये पाच हजार लेण्या असल्याची माहिती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT