buldhana bus accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident : अपघात टायर फुटल्याने नव्हे तर… ; नागपूर परिवहन विभागाचा अहवाल

Buldhana Bus Accident Update : नागपूरहून पुण्यात येत असताना एका खाजगी बसला झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

रोहित कणसे

Travel Bus Accident : नागपूरहून पुण्यात येत असताना एका खाजगी बसला झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. बुलढाण्यातील ही दुर्घटना बसचा टायर फुटल्याने झाली नसून हा अपघात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाल्याचा अहवाल नागपूर परिवहन विभागाने दिला आहे.

टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं बस चालकाने सांगितलं होतं मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आला आहे. आता या अहवालामुळे घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. बुलढाणा येथील अपघातस्थळाची पाहाणी केल्यानंतर अमरावती आरटीओने हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

सुरूवातीला बसचा टायर फुटला त्यानंतर ती दुभाजकाला जाऊन धडकली, पलटी झाली आणि त्यानंतर बसने पेट घेतला अशी माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आता पहिल्यांदा बसचा टायर फुटला नसून चालकाचे नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपघातस्थळी पोहचले असून त्यांनी अपघातस्थळाची पाहाणी केली. यावेळी बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते.

अपघात कसा झाला?

नागपूरहून पुण्यात येत असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघातातील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

WPL 2026: Mumbai Indians चे आव्हान संपले! दिल्ली कॅपिटल्सच्या युपीवरील विजयाने प्लेऑफचं चित्र स्पष्ट

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

SCROLL FOR NEXT