buldhana bus accident Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bus Accident : "वाचवा रे म्हणत हंबरडा फोडणारे लोकं डोळ्यांसमोर जळत होते"; होरपळलेलं लहान लेकरू अन्... | घटनेचा थरार

'आतले लोकं काच फोडण्याचा प्रयत्न करत होते पण...' आयुष्यात पहिल्यांदा हे दृश्य पाहिलं म्हणत प्रत्यक्षदर्शींना कोसळलं रडू

दत्ता लवांडे

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा अपघात होऊन जवळपास २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या अपघातातून ८ जणांचा जीव वाचला आहे. ही बस नागपूरहून पुण्याला जात होती त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा येथे हा अपघात झाला.

(Buldhana Bus Accident Latest Update)

दरम्यान, एकूण ३३ प्रवाशांना घेऊन ही बस नागपूरहून येत असताना मध्यरात्री १ वाजून २० मिनीटांनी बस रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकाला धडकली अन् पलटी होऊन तीने पेट घेतला. दरवाजाच्या बाजूने बस पलटी झाल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आलं नाही, त्यामुळे फक्त सात ते आठ जण बाहेर येऊ शकले. या घटनेचा थरार सांगताना प्रत्यक्षदर्शींना अक्षरश: रडू कोसळलं आहे.

"आमचे बंधू चक्की बंद करून जोरात पळू लागल्याने मी त्यांच्या मागे धावत गेलो, आम्ही काही लोकांना वर काढण्याचा प्रयत्न केला पण गाडीने पेट घेतल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नव्हते. सुरूवातील थोडा थोडा जाळ सुरू होता पण त्यानंतर लगेच गाडीचा मोठा स्फोट झाला आणि गाडीचे काही पार्ट आजूबाजूला उडून पडले. "

"आतमध्ये असेलले लोकं मोठ्याने आरडाओरडा करत होते. कुणी काचेवर मोठ्याने मारत होते, त्यांना वाटत होतं खिडकीची काच फुटेल पण काच फुटली नाही. लोकं आतमधून वाचवा रे... वाचवा रे... म्हणत मोठ्याने हंबरडा फोडत होते. हे पाहून मलाही खूप रडायला आलं, असं दृश्य मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं. घटनेनंतर १५ ते २० मिनीटांनी पोलिसांच्या गाड्या आल्या." अशी माहिती स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी अभिमन्यू दराडे यांनी दिली.

"खूप भयंकर परिस्थीत होती, आम्ही आमच्या डोळ्यांनी लोकांना जळताना पाहत होतो, पण तरीही आम्ही काही करू शकत नव्हतो. लहान बाळ जळालेलं पाहून आमच्या अंगावर शहारे आले. जे लोकं गाडीतून वाचले होते तेही गाडीच्या मागे आणि पुढे धावले. जो शेवटचा व्यक्ती बाहेर आला त्याने सांगितलं की, मी गाडीतून बाहेर पडलो त्यावेळी गाडीचा स्फोट झाला त्यामुळे बाकीच्या लोकांना बाहेर येता आलं नाही." असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT