धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले गेले असल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात आज बुलढाणा जिल्ह्यात घडली. या घटनेत दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी सुरुवातीला मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्यानंतर त्यांना जळगावमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Buldhana hands of two youths who were exercising on the roadside cut off by the torn sheet of a st bus)
ही घटना मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास घडली. यावेळी काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. यावेळी याच मार्गावरुन मलकापूर आगाराची बस जात असताना चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागून दोन तरुणांचे हात कापले गेले. इतकेच नव्हे तर दोन्ही तरुणांचे हात तुटून पडले असल्याची गंभीर बाब समोर आली.
विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील अस या दोन्ही तरुणांच नाव असून त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे.
दोघांच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी एसटी महामंडळाने घेतली आहे. सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे.
तप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला. आगार व्यवस्थापक दराडे हे कार्यालयात असताना, या बसचा पत्रा तुटून बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर कशी काढली, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.