solapur city police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहरात चोऱ्या- घरफोड्या! पोलिस म्हणतात, नागरिकांनी ‘या’ ११ सूचना पाळल्यास कधीच होणार नाही चोरी; डायल ११२ अन्‌ १९३० हे क्रमांक सेव्ह करुन ठेवा

सोलापूर शहरात नेहमीच घरफोडी, चोरीचे प्रकार होत आहेत. जुळे सोलापुरातील घरफोडीनंतर चोरट्याने विडी घरकूल परिसरातील एटीएम मशीनच चोरून नेली. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे लोक घराचे दरवाजे उघडे ठेवून बाहेर किंवा टेरेसवर झोपतात. उन्हाळा सुट्टीमुळे लोक परगावी जातात. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे बंद घरांमध्ये चोरी करतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात नेहमीच घरफोडी, चोरीचे प्रकार होत आहेत. जुळे सोलापुरातील घरफोडीनंतर चोरट्याने विडी घरकूल परिसरातील एटीएम मशीनच चोरून नेली. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे लोक घराचे दरवाजे उघडे ठेवून बाहेर किंवा टेरेसवर झोपतात. उन्हाळा सुट्टीमुळे लोक परगावी जातात. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे बंद घरांमध्ये चोरी करतात. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही लावा, घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका, खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

सोलापूर शहराची लोकसंख्या १२ लाखांवर पोचली असून दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत आहे. दुसरीकडे पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्यांची संख्या अपुरी आहे. या पार्श्वभूमीवर अडचणीतील नागरिकांनी पोलिसांची मदत मिळविण्यासाठी ‘डायल ११२’ हा क्रमांक लक्षात ठेवावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणूक केल्यास त्यांनी तातडीने ‘१९३०’ या क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरुन सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम त्याच बॅंक खात्यात थांबविता येते, असेही पोलिसांनी सांगितले. एकूणच चोरी, घरफोडी होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने सावध राहावे, जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत.

पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन...

  • रात्री झोपताना घराचे दरवाजे व खिडक्या व्यवस्थित बंद करा.

  • घरात आवश्यकता नसल्यास जास्त रोकड, मौल्यवान वस्तू ठेवू नका.

  • झोपण्यापूर्वी सर्व दरवाजे, कडी-कोंडे बंद केल्याची खात्री करा.

  • घरात रात्री एक सुरक्षा लाईट सुरू ठेवा, मोबाईल खिडकीजवळ चार्जिंग लावू नका.

  • मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी फिरायला जाताना महिलांनी अंगावर दागिने घालणे टाळावे.

  • रिक्षा, बस प्रवासात अनोळखी व्यक्तीने दिलेले खाण्याचे पदार्थ, पेय स्वीकारू नका.

  • गर्दीच्या ठिकाणी पाकिट चोरापासून सावध राहा, स्वत:च्या वस्तूंवर लक्ष ठेवा.

  • बॅंकेतून पैसे काढताना एकटे जाऊ नका, एटीएम, पीन, ओटीपी, बॅंक खात्याची माहिती कोणाला देऊ नका.

  • घरासमोर उभी केलेली दुचाकी, कार व्यवस्थित लॉक करा, संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना द्या.

  • बाहेरून कामासाठी आलेल्या व्यक्तींची ओळख व कागदपत्रांची खात्री करून घ्या.

  • दुकाने, घर किंवा बंगल्याच्या चारही बाजूंनी नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT