jewellery theft

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात ९.५७ लाखांची घरफोडी! अमेरिकेतून आलेल्या मुलीला आणायला मुंबईला गेल्यावर चोरी; पहिल्या घरी काही मिळाले नाही, दुसऱ्या घराचे तोडले कुलूप अन्‌...

जुळे सोलापुरातील रेवती सिद्धेश्वर तमशेट्टी (वय ६३) या अमेरिकेतून विमानाने आलेल्या मुलीला आणण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. त्यांच्या मुलाचा विवाह आहे. सोमवारी (ता. ११) जाताना त्यांनी घर बंद केले होते; मात्र चोरट्याने त्याच दिवशी मध्यरात्री कुलूप तोडून घरातील नऊ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तात्या लांडगे

सोलापूर : जुळे सोलापुरातील रेवती सिद्धेश्वर तमशेट्टी (वय ६३) या अमेरिकेतून विमानाने आलेल्या मुलीला आणण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. त्यांच्या मुलाचा विवाह आहे. सोमवारी (ता. ११) जाताना त्यांनी घर बंद केले होते; मात्र चोरट्याने त्याच दिवशी मध्यरात्री कुलूप तोडून घरातील नऊ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईहून सोलापुरात आल्यानंतर रेवती तमशेट्टी यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील कपाटातील दागिनेही नव्हते. त्यांनी विजापूर नाका पोलिसांना चोरीची माहिती दिली. पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, दिलीप पवार, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. त्यात चोरटा एकटाच असल्याचे दिसत आहे. चोरट्याने तमशेट्टी यांच्या घरातून ३० हजार रुपयांची रोकड, पाच तोळ्यांचे सोन्याचे कडे, दहा जोड कर्णफुले (चार तोळे), एक तोळ्याचा नेकलेस, दीड तोळ्याचे लॉकेट, ३० तोळे चांदीचे दागिने (कंबरपट्टा, तोडे, हातातील वाळे, मनगट्या, पैंजण) व ३२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सात अंगठ्या चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शहर गुन्हे शाखा व विजापूर नाका पोलिसांची पथके चोरट्याचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड तपास करीत आहेत.

पहिल्या घरी काही मिळाले नाही म्हणून दुसऱ्या घरात चोरी अन्‌...

चोरट्याने पहिल्यांदा जुळे सोलापुरातील माजी सैनिक नगरातील प्रतिभा रमाकांत आष्टे यांच्या घरात चोरी केली. त्याठिकाणी त्याला केवळ दीड हजार रुपये आणि चांदीचे काही ग्रॅमचे फूलपात्र मिळाले होते. तेथून चोरट्याने गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळील गीता नगरातील रेवती सिद्धेश्वर तमशेट्टी यांच्या घरी चोरी केली. तेथे चोरट्याला सव्वानऊ लाखांचा ऐवज मिळाला. मोठा ऐवज हाती लागल्यानंतर चोरटा लगेच पसार झाला. त्याच कपाटात दुसरीकडे अडीच-अडीच तोळ्यांच्या चार बांगड्या (१० तोळे) ठेवल्या होत्या. चोरट्याला त्या मिळाल्या नाहीत. तो घाईत तसाच निघून गेला असावा, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT