Avinash Bhosale Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी: अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही CBIकडून जप्त

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पुण्यातील उद्योगपती आविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही आज CBIकडून जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे येस बँक आणि डीएचएफएल (Yes Bank-DHFL) गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोसलेंना CBIकडून पुन्हा धक्का बसला आहे. पुण्यातील बाणेर येथील त्यांच्या घरातून हे हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.

(Businessman Avinash Bhosle's Helicopter Seized by the CBI)

युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या कन्सोर्टियमला 34,615 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या DHFL च्या घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. त्यानंतर त्यांना सीबीआयने अटक केली होती. आज त्यांचे ऑगस्टा वेस्टलँडचे हेलिकॉप्टर आज सीबीआयकडून जप्त करण्यात आले.

दरम्यान, भोसले यांना 26 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.

भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे घातले होते. तर मागील वर्षी "सीबीआय'ने त्यांची तब्बल 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास "सीबीआय'कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे.

दरम्यान, याच बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, "सीबीआय'कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात "सीबीआय'ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT