Eknath Khadse on Devendra Fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion : भाजपच्या आमदारांमध्येही नाराजी, पण ते...; एकनाथ खडसेंचा मोठा दावा

रवींद्र देशमुख

जळगाव - राज्यात राजकीय भूकंप घडला आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह सरकारमध्ये सामील होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांसह शपथ घेणाऱ्या नेत्यांना अद्याप खाते मिळाले नाहीत. यावरून सत्ताधारी पक्षामध्ये धुसफूस सुरू आहे. या सर्व परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आमदारांच्या नाराजीवर बोट ठेवलं आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, दहा दिवसांपूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र खाते वाटप झालेलं नाही. यात अजित दादांना अर्थ खातं दिले जाईल हे निश्चित नाही, तो एक अंदाज आहे. तस पाहिलं तर गेल्यावेळी अजित दादांकडे अर्थ खातं असल्यामुळेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या तक्रारी होत्या. आता पुन्हा अजित दादांना तेच खातं दिलं जात असेल तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येऊ शकते. मात्र त्यांना वरिष्ठ नेत्यांच्या निर्णय मान्य करावा लागेल.

शिवसेना शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. अनेक आमदार सांगत आहेत की मी मंत्री होणार आहे. मी पालकमंत्री होणार आहे. काहीजण म्हणतात, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. माझा शपथविधी ठरलेला आहे. प्रत्येकाला मंत्रीपद हवं आहे. प्रत्येक जण मंत्रीमंडळात जाण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवरून मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपानंतर नाराजी ही उफाळून येणार असल्याचा दावा खडसे यांनी केला.

दरम्यान भाजपच्या आमदारांमध्येही नाराजी आहे. मात्र ते नाराजी बाहेर बोलत नाही. बाकीचे जसे उघडपणे बोलतात. ते बोलत नाही. भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपमधील अनेक आमदार माझ्याशी बोलताना नाराजी व्यक्त करतात. राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या निर्णयाविरोधात ते नाखुश असल्याचे सांगतात, असंही खडसे यांनी नमूद केलं.

एकूणच आज उद्या या परिस्थितीचा परिणाम जो दिसेल तो या तिन्ही पक्षांसाठी अनुकूल असेल असं वाटत नसल्याचा दावा खडसेंनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT