cabinet expansion issue eknath Shinde sick devendra Fadnavis in Delhi politics mumbai  sakal
महाराष्ट्र बातम्या

CM आजारी, फडणवीस दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरूच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नसताना राज्यातील राजकीय तिढा आणखी वाढला आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदारांबाबतच्या याचिकांची लांबणीवर पडलेली सुनावणी, न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेले आदेश यामुळे हा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जाते. आता पुन्हा रविवारी किंवा त्यानंतर लवकरच विस्तार होईल, असे सांगून सरकारमधील नेते वेळ मारून नेत आहेत.

गेल्या सव्वा महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी होण्याची शक्यता होती. त्यासाठी १२ जणांची नावे निश्चित झाल्याची चर्चा रंगली होती. त्यात भाजपचे ७ आणि शिंदे गटाचे ५ जण शपथ घेण्याचा अंदाज होता. परंतु, शिवसेना आणि बंडखोरांबाबतच्या याचिकांची सुनावणी येत्या सोमवारी होणार असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे शपथविधीची चर्चा थांबली.

शिंदे आजारी, फडणवीस दिल्लीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने दिवसभरातील त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार दीपक केसरकर हे दिल्लीला रवाना झाले. मंत्रिमंडळ विस्तारातील भाजप आमदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी फडणवीस हे दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे, न्यायालयीन लढाईत शिंदे गटाला धक्का बसण्याच्या शक्यतेने फडणवीस, केसरकर हे दिल्लीला गेल्याची चर्चा आहे.

फडणवीस दिल्लीत कोणाकोणाला भेटणार?

दिल्लीत फडणवीस भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.


संभाव्य निकालाबाबत चर्चा
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात जाऊन शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द झाल्यास भाजपसमोर कोणते पर्याय आहेत, याबाबत फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर न्यायालयीन निकालाच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेबाबत असलेल्या विविध पर्यायांचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे.

शिंदे गटाचे खासदार राष्ट्रपतींना भेटणार

शिवसेनेच्या शिंदे गटाचे सर्व खासदार आज (शुक्रवारी, ५ ऑगस्ट) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत. ही शिष्टाचार भेट असल्याचे या गटाच्या लोकसभेतील प्रतोद भावना गवळी यांनी सांगितले. नव्या राष्ट्रपतींची भेट घेऊन औपचारिक अभिनंदन करण्याचे नियोजन शिंदे गटाच्या खासदारांनी केले आहे. उद्या दुपारी साडेबाराला राष्ट्रपती भवनात सर्व बारा खासदार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. यामध्ये लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे, प्रतोद भावना गवळी, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, सुभाष लोखंडे, श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, हेमंत पाटील, कृपाल तुमाने, हेमंत गोडसे आणि धैर्यशील माने यांचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT