Cabinet Expansion esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion: तारीख ठरली? राज्यात पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्ताराबाबतच्या हालचालींना वेग

Cabinet Expansion: नाराज झालेल्या आमदारांना मंत्रिपद देऊन समाधान करण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

Cabinet Expansion: गणेश उत्सवापूर्वी राज्याचे शिंदे-फडणवीस-पवार सरकार उर्वरित चौथ्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे.

गणेश उत्सवापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होईल असे म्हटले जात असून या मंत्रिमंडळामध्ये तब्बल 14 जण मंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. यावर तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईमध्ये नुकतीच बैठक झाल्याचे सांगितले जात आहे.

अधिक माहिती अशी कि , शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासूनच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होणार? याच्या चर्चा संपूर्ण राज्यात रंगू लागल्या होत्या. याचबरोबर शिंदें सोबत आलेल्या आमदारांनी देखील मंत्रिपदाची इच्छा कित्येकदा बोलून दाखवली होती. मात्र अजित पवार यांनी सत्तेमध्ये एन्ट्री घेतली आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे शिंदेंच्या आमदारांची संधी हुकली.

तर दुसरीकडे होणाऱ्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांच्या वाट्याला सर्वाधिक ७ जागा दिल्या जाणार आहेत. मात्र उर्वरित सात मंत्रिपद जी शिवसेनेला मिळणार होती.ती आता राष्ट्रवादीला वाटावी लागणार आहेत. अशी चर्चा आहे.

शिवसेनेच्या काही आमदारांची मंत्रिपदाबाबतची इच्छा जग जाहीर आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. यामुळे या विस्तारात नक्की कोणाकोणाचं समाधान शिंदे-पवार-फडणवीस सरकार करतं हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे.

याचबरोबर नाराज झालेल्या आमदारांना मंत्रिपद देऊन समाधान करण्याचा प्रयत्नही यावेळी युतीतील नेत्यांचा राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे या विस्तारात नक्की कोणाकोणाची वर्णी लागणे ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.असे वृत्त साम टीव्ही ने प्रसारित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT