ambadas danve and Bacchu Kadu 
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion : मंत्रीपद देतच नाहीत, तर त्याग कशाचा करतायत? अंबादास दानवेंचा बच्चू कडूंना खोचक सवाल

रवींद्र देशमुख

मुंबई - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तार सर्वाधिक चर्चीला गेलेला विषय आहे. मात्र अजुनही याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी तर थेट आपण मंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं. यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी बच्चू कडूंना सूचक सवाल केला आहे.

बच्चू कडू म्हणाले होते, की आपण मंत्रीपदाच्या शर्यतीत नसून आपण त्याचा त्याग केला आहे. यावर अंबादास दानवे म्हणाले की, ते अर्थात शिंदे सरकार तुम्हाला मंत्रीपद देतच नाहीत, तर मग त्याग कशाचा करत आहात. तसेच ते काय मंत्रीपद घेऊन तुमच्या मागे फिरत आहेत का? ते त्यांच्याच लोकांना मंत्रीपद देऊ शकत नाहीत, मग तुम्हाला कुठून मंत्रीपद देणार, अशी टीकाही दानवे यांनी केली.

दररोज सांगण्यात येत, मंत्रीमंडळ विस्तार, आज होईल, उद्या होईल, परवा होईल. आधी, खातेवाटप व्हायला पाहिजे. पण आपल्याला वाटत नाही की, मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, असंही दानवे यांनी नमूद केलं. तसेच एकनाथ शिंदे सोबतच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही, तर अपक्ष आणि इतरांना न्याय देणे दुरापास्त असल्याचं दानवे यांनी नमूद केलं.

सध्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या धावपळीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेत आपण यासाठी आग्रही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली, तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत आपण त्यांचा गुलाम म्हणून काम करेन अशी अजब घोषणाही केली. यावेळी त्यांनी मंत्रीपदासाठी आपण उत्सूक नसल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT