cabinet meeting decided to withdraw cases against organizers of bullock cart race  
महाराष्ट्र बातम्या

बैलगाडा शर्यत आयोजकांवरील गुन्हे अखेर मागे; मंत्रिमंडळचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

बैलगाडा शर्यतीसंबंधी विविध गुन्हे मागे घ्यावे ही मागणी अनेक दिवसांपासून होत होती. गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याची सांगितले जात होते. दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैलगाडा शर्यतीवरील गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. बैलगाडी शर्यती बाबत जे काही गुन्हे दाखल झाले होते अशा काही नुकसानी बाबत काही अटी शर्ती घालून त्या सर्व केसेस मागे घ्याव्यात, असा निर्णय झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

बैलगाडा शर्यती अंतर्गत दाखल सर्व गुन्हे मागे घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाला गृहविभागाने मान्यता दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना याबातची माहिती दिली.

बैलगाडा शर्यतीवरील बंदीच्या काळात बंदी उठावावी यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. अनेकांनी शर्यतींचं आयोजनदेखील केलं यादरम्यान अनेक लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर आता सर्वत्र अटी शर्तींसह बैलगाडा शर्यती सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT