Home Minister Amit Shah Ahmedabad esakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah : "शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना शिक्षा झाली पाहिजे"

सकाळ डिजिटल टीम

अमित शाह ए.एम. नाईक विद्यालयात

आज पवई येथील ए.एम. नाईक विद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपुर्ण संस्थेची माहिती देखील शाह यांनी घेतली.

अमित शाहांना अशी भाषा शोभत नाही - मनिषा कायंदे

अमित शाहांना अशी शोभत नाही, भाजप स्वबळावर निवडणूक का लढवत नाही असा सवाल शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा भगवा कुणी उतरवू शकत नाही - अरविंद सावंत

भजपच्या अमित शाहा यांनी आपल्या बैठकीत शिवसेनेवर हल्लाबोल केल्यानंतर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधत मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा भगवा कुणी उतरवू शकत नाही असं सूतोवाच केलं आहे.

बैठकीत अमित शाहांचा शिवसेनेवर हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेवर हल्लाबोल केला असून शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला असून एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे असंही सूतोवाच केलं आहे.

  • शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाली.

  • फक्त दोन जागेसाठी शिवसेने युती तोडली

  • आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केलं नाही

  • उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला.

  • राजकारणात धोका देणाऱ्यांचे राजकारण यशस्वी होत नाही.

  • एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ते आपल्यासोबत आहेत.

  • राजकारणात धोका सहन करू नका

  • बीएमसी जिंकण्यासाठी तयारीला लागा

  • बीएमसीसाठी भाजप शिंदे गटाचं १५०चं टार्गेट

  • मुंबईच्या राजकारणात फक्त भाजपचं वर्चस्व राहिलं पाहिजे

  • खयाली पुलावमुळे शिवसेनेची ही अवस्था

  • शिवसेनेने आमच्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला, त्यांना शिक्षा झाली पाहिजे

  • आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचंय

  • उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे.

  • मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार

  • आपली ही शेवटची निवडणूक आहे असं समजा, कारण अभी नही तो कभी नही

भ्रष्टाचार केलेल्यांना खाली खेचण्याची ही वेळ - शेलार

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

'मेघदूत'वर भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. मेघदूत या बंगल्यावर ही बैठक सुरू असून महापालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यात येत आहे.

शाहांचा ताफा 'सागर'वर दाखल

अमित शहांचा ताफा सागर बंगल्यावर पोहोचला आहे. येथेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर या बैठकांना महत्त्व प्राप्त झाले असून शाह आपल्या पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष लागलेले आहे.

 अमित शाहांचा ताफा 'सागर'कडे रवाना

गणपतींचे दर्शन घेऊन अमित शाह आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या निवासस्थानाकडे रवाना झाला आहे. यानंतर आता राजकीय बैठकांना सुरूवात होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

अमित शाह वांद्रेतील बाप्पाच्या दर्शनाला

वांद्रे येथील शेलारांच्या घरच्या बाप्पांच्या दर्शनाला अमित शाह पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित आहेत.

अमित शाह लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लालबाग येथे सहकुटुंब दाखल झाले असून त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत.

अमित शाहांच्या गाड्यांचा दौरा लालबागचा राजाच्या दिशेने रवाना

शिक्षक दिनानिमित्त आज दुपारी पवईत नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाईक विद्यालयाचे उद्घाटन अमित शाहांच्या हस्ते होणार आहे. शाह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी घेतली अमित शाहांची भेट

अमित शाहांचं मराठीतून ट्वीट

गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल.

असं ट्वीट अमित शाहांनी केलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे अमित शाहांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांच्या भेटीला गेले आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत.

कडक पोलिस बंदोबस्त

अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मुंबई शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.

या दौऱ्यानिमित्ताने 4 आणि 5 सप्टेंबर रोजी मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील काही भागात वाहतुकीचे नियम लागू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे 5 सप्टेंबरला सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत लालबाग, परळ, लोटस जंक्शन, महालक्ष्मी रेसकोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन, मलबार हिल, केम्प्स कॉर्नर, बाबुलनाथ, हाजी अली, वरळी डेअरी वरळी सी लिंक आणि लीलावती जंक्शन आदी भागात वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राइव्ह, रिगल जंक्शन आणि कुलाबा परिसरात सोमवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मरोळ आणि पवई भागात सोमवारी दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत निर्बंध असतील.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री नसणार

आज अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असून सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत दर्शनाला जाणार नाहीत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाले आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्याबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार असल्याच्या चर्चा असून ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT