Narayan Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री घरी आयसीयूत बसून; राणेंचा राज्य सरकारवर घाणाघात

महाविकास आघाडी सरकार म्हणजे सावळा गोंधळ

निनाद कुलकर्णी

सिंधुदुर्ग: महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) मंत्रालयात गेली दोन वर्षात केवळ निवडणुका, पक्षबांधणीसाठी बैठका घेत आहेत. मात्र, या सर्व बैठकांमध्ये मुख्यमंत्री आलेच नाहीत. त्यांचा प्रशासनावर वचक नसून ते घरी आयसीयुमध्ये बसून आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Cabinet Minister Narayan Rane) यांनी केली आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील पेपर फुटी प्रकरणावरुनही महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे सावळा गोंधळ असून, राज्यकर्ते जनतेची कामे करत नसून या सरकारच्या काळात राज्य सुरक्षित नाहीये असे सांगत ते म्हणाले की, भ्रष्टाचार करून पैसे सोडवणे हाच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi ) सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे. यावेळी त्यांनी लघु आणि सुक्ष्म, मध्यम उद्योग खात्याच्या (MSME) मंत्रालयातून देशाचे उत्पन्न वाढवणे, जीडीपी वाढवून देशाला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जिल्ह्यात उद्योगाचं जाळे वाढविणार आहे.

कोरोना काळात (Corana ) रूग्णांची काळजी घेण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगत कोरोना काळातील मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी राज्य सरकारवर केला. आपल्या खात्यातंर्गत येणारे कोअर कार्यालय कणकवलीमध्ये सुरू करणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT