solapur city police sakal
महाराष्ट्र बातम्या

‘112’वर कॉल करा अन्‌ 4.30 मिनिटात पोलिसांची मदत मिळवा! सोलापूर शहर पोलिस राज्यात सातव्या क्रमांकावर; बुधवार-गुरुवारी पतीच्या छळाचे अधिक कॉल, वाचा...

सोलापूर शहराची लोकसंख्या १२ लाखांवर, पोलिस ठाणी अवघी सात, अशावेळी प्रत्येक ठिकाणी संबंधित पोलिस ठाण्यातील अंमलदारांना मदतीसाठी वेळेत पोहोचता येत नाही. अशावेळी शासनाच्या ‘डायल ११२’ उपक्रमातून अडचणीतील नागरिकांना अवघ्या ४.३० ते ५ मिनिटांत पोलिसांची मदत मिळू लागली आहे. सोलापूर शहरातील दररोज सरासरी ९० जणांना पोलिस मदत करतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहराची लोकसंख्या १२ लाखांवर, पोलिस ठाणी अवघी सात, अशावेळी प्रत्येक ठिकाणी संबंधित पोलिस ठाण्यातील अंमलदारांना मदतीसाठी वेळेत पोहोचता येत नाही. अशावेळी शासनाच्या ‘डायल ११२’ उपक्रमातून अडचणीतील नागरिकांना अवघ्या ४.३० ते ५ मिनिटांत पोलिसांची मदत मिळू लागली आहे. सोलापूर शहरातील दररोज सरासरी ९० जणांना पोलिस मदत करतात.

सोलापूर शहरात विडी कामगार व ‘एमआयडीसी’तील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. बहुतेक कामगारांना बुधवारी सुट्टी असते. त्या दिवशी कौटुंबिक छळासंदर्भात महिलांचे सर्वाधिक कॉल येतात, असेही पोलिसांनी सांगितले. याशिवाय गल्लीत सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ किंवा हाणामारी सुरू आहे, अपघात झाला आहे, स्पीकरचा आवाज मोठ्याने सोडला आहे, गोमांस तस्करी सुरू असल्यासंदर्भातील देखील कॉल जास्त असतात, असेही पोलिस म्हणाले.

‘डायल ११२’द्वारे अडचणीतील नागरिकांना मदत करणाऱ्या पोलिस गाड्यांना ‘जीपीएस’ बसविले आहे. त्यामुळे कोणती गाडी सध्या कोणत्या परिसरात आहे, त्याचे लोकेशन लगेच समजते. अडचणीतील नागरिकांना तातडीची मदत मिळावी म्हणून जवळच्या गाडीला सांगून तेथे पाठविले जाते. ‘११२’ क्रमांकावर कॉल करण्यासाठी मोबाईलमध्ये बॅलन्स असावा, असे बंधन नाही. अडचणीतील नागरिकांनी मदत मागताना केवळ ठिकाण सांगायचे आहे, जेणेकरून पोलिस घटनास्थळी ४.३० ते ५ मिनिटांत पोहोचू शकतात, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर शहर पोलिस राज्यात सातव्या क्रमांकावर

राज्यातील ४५ युनिटमध्ये सोलापूर शहर पोलिस अडचणीतील नागरिकांना मदत करण्यामध्ये सातव्या क्रमांकावर आहेत. शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस अवघ्या साडेचार ते पाच मिनिटात त्याठिकाणी पोचतात. कौटुंबिक कारणातून पती किंवा सासरचे त्रास देत आहेत, असे कॉल अधिक असतात.

- प्रताप पोमण, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

अग्निशामक किंवा रुग्णवाहिकेचीही मदत

११२ या टोल फ्री क्रमांकावरून केवळ पोलिसांचीच मदत नव्हे, तर आता आग लागली किंवा अपघात झाल्यास रुग्णवाहिकेची मदत देखील मिळणार आहे. पण, कोणी मस्करी म्हणून कॉल केल्यास पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई देखील होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT