प्रचार sakal
महाराष्ट्र बातम्या

मतदारांपर्यंत चिन्ह पोचविण्यासाठी उमेदवारांची धडपड! रॅली, पदयात्रा, रिक्षातून चिन्हाचाच अधिक प्रचार; उद्या सायंकाळी ५.३० वाजता थंडावणार प्रचार

महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. रविवारी बहुतेक मतदार घरी सापडतील म्हणून भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेनेसह माकप, वंचित बहुजन विकास आघाडी, एमआयएम, समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिला होता.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. मंगळवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. रविवारी (ता. ११) बहुतेक मतदार घरी सापडतील म्हणून भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेनेसह माकप, वंचित बहुजन विकास आघाडी, एमआयएम, समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिला होता. याशिवाय या उमेदवारांच्या रिक्षातूनही गल्लीगल्लीत प्रचार सुरु होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, समाजवादीचे रियाज खरादी, काँग्रेसचे चेतन नरोटे यांच्यासह बहुतेक उमेदवारांनी प्रभागात पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन देखील केले.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर असल्याने आमदारांना तथा पक्षातील बड्या नेत्यांना उमेदवारांची नावे सांगावी लागत नाहीत. कमळ हेच आपला उमेदवार असल्याचा प्रचार लोकप्रतिनिधी सर्व प्रभागांमध्ये करीत आहेत. दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणूक होत असल्याने युतीतील उमेदवारांना घड्याळ व धनुष्यबाण ही चिन्हे आमची असल्याचे सांगावे लागत आहे.

तसेच सर्वात मोठे आव्हान महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर असून चार सदस्यीय प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह हात, दुसऱ्याचे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस, तिसऱ्याचे चिन्ह मशाल आणि चौथ्याचे चिन्ह हातोडा विळा व तारा असल्याचे आवर्जुन सांगावे लागत आहे. प्रत्येक प्रभागात अपक्ष आणि अन्य पक्षांचे देखील उमेदवार असल्याने आपले चिन्ह मतदार विसणार नाहीत, याकडे युती व महाविकास आघाडीतील उमेदवारांनी अधिक लक्ष दिल्याचे रविवार पहायला मिळाले. १५ जानेवारीला मतदान असून त्यापूर्वी आपल्या प्रभागातील मतदार माझे चिन्ह पक्के लक्षात ठेवेल, याची खरबदारी उमेदवार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

उमेदवारांची अशी आहेत चिन्हे...

काँग्रेस पक्षाचे हात, भाजपचे कमळ, माकपचे हातोडा विळा व तारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ, शिवसेनेचे धनुष्यबाण, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मशाल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी वाजविणारा माणूस, एमआयएमचे पतंग, मनसेचे रेल्वे इंजिन, समाजवादी पार्टीचे सायकल, आपचे झाडू, वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलिंडर, अशी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची चिन्हे आहेत. याशिवाय अन्य उमेदवार शिटी, एअर कंडीशनर, सफरचंद, किटली, कपाट, शिवणयंत्र, नारळ, पुस्तक, चावी, कपबशी, पांगुळ गाडा, फुगा, ट्रॅक्टर, फुटबॉल, ऑटो रिक्षा, रोड रोलर, टोपली, बॅट, संगणक, दुरदर्शन संच, मेणबत्ती, ऊस, छत्री या चिन्हांवर निवडणूक लढवित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पुण्यातील CJP आंदोलकांचा मास्टर प्लॅन! पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आर्टिकल २२६ चा वापर; आता हायकोर्टाचे पोलिसांना थेट आदेश!

HDFC Bank CEO Salary: नव्या CEO ना मिळणार इतका पगार की RBI गव्हर्नरचं वेतनही वाटेल कमी! किती आहे संपूर्ण पॅकेज?

Marathi News Live Updates : सोलापुरात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आयोजकाविरोधात गुन्हा दाखल, शिलाई मशीन आणि अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम भोवला

School Fee: फी नाही भरली, तर मुलीला शाळेत पाठवू नका; कोरेगावच्‍या शाळेचा अजब फतवा

Delhi CJP Protest CJPचा धसका! २५० रेल्वे रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद; ४५ हजार जवान तैनात, आंदोलकांची धरपकड

SCROLL FOR NEXT