सोलापूर : भाजपने अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व सोलापूर शहर उत्तर येथील उमेदवार जाहीर केले असून, विद्यमान आमदारांनाच संधी दिली आहे. उर्वरित आठ जागांवरील उमेदवार कोण, हा सस्पेन्स कायम आहे. तरीपण, बार्शी, माळशिरस, सांगोला व मोहोळ या मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पुन्हा मैदानात उतरविले जाईल. दुसरीकडे माढा व करमाळ्यातील विद्यमान आमदारांनी महायुतीऐवजी अपक्ष लढण्याचे जाहीर केल्याने त्यांची मनधरणी सुरू आहे. तर पंढरपूर-मंगळवेढ्यात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने त्यांची नाराजीही दूर केली जात आहे. ‘शहर मध्य’ मतदारसंघ कोणाला सुटणार हे जाहीर झाले नाही.
महायुतीतील भाजपला जिल्ह्यातील सहा जागा मिळणार, हे निश्चित आहे. याशिवाय उर्वरित पाचपैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर दोन जागा शिवसेनेला मिळतील, असे पक्षातील वरिष्ठांकडून सांगितले जात आहे. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:कडे ठेवणार की शिवसेनेला देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मोहोळ, माढा व शहर मध्य की मोहोळ, माढा, करमाळा हे मतदारसंघ राष्ट्रवादी आपल्याकडे ठेवणार, हे आगामी दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलाने रणजितसिंह यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे. त्यांची मनधरणी केली जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच पंढरपूर-मंगळवेढ्यातून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना बाजूला सारणे भाजपच्या हिताचे नाही. त्यामुळे प्रशांत परिचारक यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे.
पाच दिवसांच्या मुदतीमुळे दोन दिवसांत ठरणार उमेदवार
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सातपैकी अवघे पाच दिवस मिळणार आहेत. उद्यापासून (मंगळवार) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचे उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून अजूनही एकूण आठ जागांवरील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पण, अर्ज भरण्यासाठी मुदत कमी असल्याने पुढील दोन दिवसांत महायुतीसह महाविकास आघाडीलाही सर्वच जागांवरील उमेदवार जाहीर करावे लागणार आहेत.
महायुतीचे संभाव्य उमेदवार...
(राष्ट्रवादी काँग्रेस)
करमाळा : संजय शिंदे
माढा : बबनराव शिंदे किंवा रणजितसिंह शिंदे
मोहोळ : यशवंत माने
------------------------------------------------------------------
(भाजप)
बार्शी : राजेंद्र राऊत
पंढरपूर- मंगळवेढा : समाधान आवताडे
माळशिरस : राम सातपुते
-----------------------------------------------------------------
(शिवसेना)
सांगोला : शहाजी पाटील
शहर मध्य : ज्योती वाघमारे किंवा प्रा. शिवाजी सावंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.