solapur-pune

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

ओडिसावरून सोलापुरात येणारा साडेसहा कोटींचा गांजा पकडला! पुण्याच्या ‘कस्टम’ची कारवाई; ट्रकमध्ये भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपिवली गांजाची ४६ पोती

ओडिसामधून हैदराबादमार्गे सोलापूरकडे येणारा गांजाचा ट्रक पुण्यातील सीमा शुल्कचे नार्कोटिक्स सेल्सच्या अधिकाऱ्यांनी (कस्टम) सोलापूर-पुणे महामार्गावर पकडला. ट्रकमध्ये तब्बल एक हजार ३०९ ग्रॅम गांजा होता. त्याची किंमत अंदाजे सहा कोटी ५४ लाख रूपये आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : ओडिसामधून हैदराबादमार्गे सोलापूरकडे येणारा गांजाचा ट्रक पुण्यातील सीमा शुल्कचे नार्कोटिक्स सेल्सच्या अधिकाऱ्यांनी (कस्टम) सोलापूर-पुणे महामार्गावर पकडला. ट्रकमध्ये तब्बल एक हजार ३०९ ग्रॅम गांजा होता. त्याची किंमत अंदाजे सहा कोटी ५४ लाख रूपये आहे.

ओडिसातील गनुपूर येथून गांजा सोलापुरात आणला जात असल्याची खबर ‘कस्टम’च्या अधिकाऱ्यांना मिळाली. ‘कस्टम’च्या टीमने सोलापूर-पुणे महामार्गावर सापळा लावला. ६ ऑगस्टच्या मध्यरात्री सोलापूर-पुणे महामार्गावरून संशयित ट्रक (एमएच १६/डीके ५५५६) येत होता. अधिकाऱ्यांनी ट्रकला थांबवून झडती घेतली, पाहणी केल्यावर क्रेटखाली गांजाची पोती आढळली. यात ट्रक चालकास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गांजा ओडिसातून घेऊन सोलापुरातच द्यायचा होता. गांजाची विक्री महामार्गांवरच होते, त्यामुळे ‘कस्टम’ने गाडी शहराबाहेरच पकडली. तो गांजा सोलापुरात कोणाला देणार होता, याचा तपास पुण्याचे पथक करीत आहे.

...तर ६ महिने ते २० वर्षांपर्यंत शिक्षा

मादक पदार्थांचे बाळगणे, विक्री, सेवन किंवा तस्करी, यांसारख्या गुन्ह्यात आरोपींवर ‘एनडीपीएस’ अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल केला जातो. यात आरोपीस सहा महिने ते २० वर्षांपर्यंतच्या कारवासाची शिक्षा होऊ शकते. या कायद्यातील अनेक गुन्हे हे व्यावसायिक मात्रा किंवा गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे अजामीनपात्र असतात. कलम ३७ नुसार आरोपीला जामीन मिळणे कठीण असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

४६ पोत्यांमध्ये ६३६ पॅकेट्‌स गांजा

ट्रकमध्ये वरील बाजूला भाजीपाल्याचे क्रेट टाकण्यात आले होते, जेणेकरून कोणी अडविले तर भाजीपाल्याचे वाहन असल्याचे सांगता येईल. क्रेट्‌सखाली एक-दोन नव्हे तर तब्बल ४६ गोण्या तथा पोती (६३६ पॅकेट्‌स) भरून गांजा होता. गांजा विक्रेत्याने ट्रकसोबत चालकाशिवाय कोणालाही पाठविले नव्हते हे विशेष. यात सीमा शुल्क पथकाने वाहन, गांजा व चालकाचा मोबाईल जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT