Job Opportunity Sakal
महाराष्ट्र बातम्या

बारावीनंतर 3 ते 4 वर्षात तरुणांना हॉटेल मॅनेजमेंटमधून करिअरची संधी! सुरवातीलाच 3 ते 10 लाखांपर्यंत पॅकेज, ‘या’ ठिकाणी नोकरीची संधी

हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमास केंद्र सरकारतर्फे ‘एनसीएचएमसीटी’अंतर्गत ४० विविध संस्थांमधून सर्टिफिकेट, डिप्लोमा व डिग्री असे विविध कोर्सेस शिकवले जातात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर शहरांमध्ये विविध मॅनेजमेंट संस्थांमधून चार व तीन वर्षाचे डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमास केंद्र सरकारतर्फे ‘एनसीएचएमसीटी’अंतर्गत ४० विविध संस्थांमधून सर्टिफिकेट, डिप्लोमा व डिग्री असे विविध कोर्सेस शिकवले जातात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर शहरांमध्ये विविध मॅनेजमेंट संस्थांमधून चार व तीन वर्षाचे डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमधील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील प्रमुख चार विभाग फूड प्रॉडक्शन, फूड अँड बेव्हरेज, हाउसकिपिंग व फ्रंट ऑफिस या विभागाचे कार्य व प्रात्यक्षिक शिकवले जाते. त्याचप्रमाणे फ्रेंच क‌‍‍म्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व विविध व्यवस्थापन असे विषयही शिकवले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना विशेषत: तरुणींना करिअरची मोठी संधी उपलब्ध आहे.

हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना सेवा क्षेत्राशी निगडीत विविध नोकऱ्या व्यवसायासाठी संधी उपलब्ध होतात. पंचतारांकित हॉटेल्स, एअर लाइन्स, पर्यटन, फूड ब्लॉगर, नोकऱ्या, होम शेफ, फूड फोटोग्राफी, कस्टमर केअर, मॉल्स, मल्टीप्लेक्स, फास्टफूड कंपनी, इंडस्ट्रीअल केटरिंग, शिक्षण क्षेत्र, बँकिंग एचआर, भारतीय संरक्षण दल, आयटी, बीपीओ या क्षेत्रांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व आत्मनिर्भरता विकसित होते.

पुणे येथे भारती विद्यापीठ विश्वविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ अशा विविध नामांकित संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये बारावीनंतर तीन व चार वर्ष डिग्रीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय ‘केटरिंग’मधूनही नोकरी-रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात

विद्यार्थ्यांची अशी होते निवड...

अभ्यासक्रमातील संकल्पना, नियोजन, आत्मविश्वास, प्रत्यक्ष कार्यक्षेत्राचा अनुभव, क्षमता, जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या काळात होते. भारतात किंवा परदेशात विविध नामांकित हॉटेल, स्टँड अलोन रेस्टॉरंट, मॉल्स अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे इंटर्नशिप करण्याची चार ते सहा महिन्यांसाठी संधी देण्यात येते. अशा संस्थामध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी नामांकित कंपन्या निमंत्रित केल्या जातात. क्षमता चाचणी, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व चाचणी, गटचर्चा अशा विविध निकषांतून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांचे सुरवातीचे पॅकेज किमान तीन ते दहा लाखांपर्यंत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: अंबानींना मागे टाकत गौतम अदानी झाले आशियातील नंबर 1 श्रीमंत! कारण काय? किती झाली संपत्ती

Best Jobs 2026 : कोटींचा पगार, मोफत घर-जेवण अन् 1 वर्षात गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड मिळणार! 'ही' कंपनी देत आहे अनोखी नोकरी

लग्नानंतर त्याचं ते सत्य समजलं... शुभांगी अत्रेचा मृत पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, 'आम्हाला वाटलेलं की तो...

Video : दीप आणि ज्योतीवर कोसळणार मोठं संकट ! मालिकेतील नव्या ट्विस्टसाठी प्रेक्षकही उत्सुक

ST Bus Maharashtra : एसटी बसस्थानकांबाबत मोठे निर्णय; १ जूनपासून स्वच्छतागृह मोफत, ८ हजार नव्या बस, ३० रुपयात नाष्टा, मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT