child-marraige.jpg
child-marraige.jpg 
महाराष्ट्र

धक्कादायक! चक्क बारा वर्षीय मुलीचा केला विवाह (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिरुर तालुक्यात कामानिमित्ताने राहणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्या बारा वर्षीय मुलीचे लग्न पंचवीस वर्षीय मुलाशी लावून दिले. उस्मानाबाद येथील महादेव मंदिरात त्यांचे गुपचुप लग्न लावण्यात आले. अल्पवयीन मुलीच्या मामाने नवविवाहित मुला-मुली दोघांच्या आई वडिलांसह अल्पवयीन मुलीच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

मुळचे सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत कदम व सविता कदम कामानिमित्ताने शिरुर तालुक्यातील कासारी येथे राहतात. दरम्यान त्यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवीण मते यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनतर जुलै महिन्याच्या अखेरीस अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी प्रवीण यांचे आई वडील लहू मते व मंगल मते यांच्याशी चर्चा करून लग्न ठरविले. मुलगी बारा वर्षाची असल्याचे माहित असताना देखील तिचे लग्न प्रवीण सोबत ठरविण्यात आले.

कळंब येथील महादेव मंदिरात प्रियांका व प्रवीण यांचे लग्न त्यांच्या कोणत्याही नातेवाइकांना न सांगता लावून दिले. त्यांनतर काही दिवसातच नवविवाहित प्रवीण व अल्पवयीन मुलगी तिचे आई वडील राहत असलेल्या कासारी (ता. शिरूर) येथे राहण्यास आले. याकाळामध्ये प्रवीण याने मुलीच्या आई वडिलांना काही पैसे उसने दिलेले होते. त्यामुळे प्रवीण याने मुलीला त्यासाठी मारहाण केली. त्यामुळे अल्पवयीन मुलीने हिने तिच्या मामांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

अल्पवयीन मुलीचे मामा विनोद कोरडे यांनी शिक्रापूर येथे येत शिक्रापूर पोलिसांना घडलेली सर्व हकीगत सांगितली. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कासारी येथे जात अल्पवयीन मुलीसह तिच्या आई व पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत मुलीचे मामा विनोद भीमराव कोरडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे आईवडिल, मुलीचा पती प्रवीण लहू मते आणि त्याचे आई-वडिल मंगल लहू मते यांच्यावर गुन्हे दाखल केले. 

''सदर गुन्ह्याचा तपास उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस स्टेशन येथे रवाना करण्यात आला आहे.''
- गणेश वारुळे पोलीस निरीक्षक शिक्रापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT