case filed against NCP Vidya Chavan after Mohit Kamboj complaint regarding her statement about Amit Shah  
महाराष्ट्र बातम्या

अमित शहांबद्दलचं वक्तव्य भोवलं! विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारी नंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या जन्मस्थान आणि भाषेवरून विद्या चव्हाण यांनी टीका केली होती. त्यांनंतर भाजपच्या कंबोज यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध कलमांअंतर्गत मोहित कंबोज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि किरीट सोमय्या यांच्याविषयी केलेल्या व्यक्तव्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याबद्दल मोहित कंबोज यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

विद्या चव्हाण यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध मुंबईतील सांताक्रूझ पीएस येथे आयपीसी कलम ५००, ५०५(२), १३५ आणि ३७(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khelo India Games : जिद्दीच्या जोरावर पालीचा अनुज सरनाईक देशाच्या नकाशावर; नॅशनल बीच गेम्समध्ये महाराष्ट्राला 'सिल्व्हर' मेडल!

Akot BJP AMIM Alliance : "मीडियाने चिंधीचा साप केला"; एमआयएमसोबतच्या युतीवर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तोडले मौन!

Pune Election Bribery : बाणेर-बालेवाडीत मतदारांना पैशांचे आमिष; पोलिसांनी दोन लाख ६३ हजारांची रोकड केली जप्त!

Latest Marathi News Live Update : अपघात कमी करण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा बसवणार

ODI मध्ये यशस्वी होण्यासाठी, ऋतुराज गायकवाडला भारत सोडण्याचा सल्ला; हा फलंदाज परदेशात असता तर...

SCROLL FOR NEXT