Sada Sarvankar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sada Sarvankar : आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः स्वतःचं शस्त्र दुसऱ्याला दिल्यामुळे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सरवणकर यांचा शस्त्र परवाना रद्द होणार असल्याची माहिती, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे.

सरकारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना क्लिन चीट दिली गेल्याचा आरोप, विरोधकांकडून होत होते. मात्र त्यांना शस्त्र कायद्यांतर्गत नोटीस पाठवण्यात आली होती.

त्यांनी स्वतःचं शस्त्र दुसऱ्याला दिल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. मुंबई पोलिसांनी सदा सरवणकर यांच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रभादेवी येथील मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली होती. या राड्यावेळी दादर पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली होती.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूस आणि सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले. त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवाल आला. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले होते. ती जप्त केलेली काडतुसे आणि त्यांच्या बंदुकीचे नुमने मिळते जुळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT