Nawab Malik
Nawab Malik  sakal media
महाराष्ट्र

Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आलीय. नवाब मलिक यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. (case of atrocity against nawab malik Sameer Wankhede Washim court )

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समीर वानखडे यांच्या तक्रारीनंतर अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशीम कोर्टाने दिले आहेत. समीर वानखेडे यांनी स्वतः वाशीम कोर्टात दाखल होत २४ ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. तसेच जामिन अर्जदेखील कोर्टाने फेटाळली आहे.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखडे यांच्या कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी वाशिम सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवाब मलिक यांच्याविरोधात उद्या वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती. संबंधित प्रकरण प्रचंड गाजलं होतं. या प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. त्यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. तसेच मलिक यांच्या जातीचे कादगपत्रे समोर आणत त्यांनी खोटे कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT