solapur city crime

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

सोलापूर शहरातील शिवभोजन केंद्र चालकांकडे २० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या नितीन मच्छिंद्र कांबळे (रा. सदर बझार, सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. इरफान युन्नूस शेख (रा. भवानी पेठ) यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. २६) न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सोलापूर शहरातील शिवभोजन केंद्र चालकांकडे २० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या नितीन मच्छिंद्र कांबळे (रा. सदर बझार, सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. इरफान युन्नूस शेख (रा. भवानी पेठ) यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. २६) न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

शासनाच्या नियमानुसार तुम्ही शिवभोजन केंद्र चालवत नाहीत, म्हणून संशयित आरोपी कांबळे हा फिर्यादीच्या केंद्राचे फोटो काढून अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत होता. त्याने शहरातील दोन्ही विभागातील केंद्र चालकांकडून दरमहा हप्ता सुरू केला होता. डिसेंबरमध्ये तो हप्ता वाढवून मागत होता. तो ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देत होता. ‘माझे कायद्याचा दणका साप्ताहिक असून शिवशक्ती व भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघाचा अध्यक्ष आहे’ असे म्हणून तो शिवभोजन केंद्र चालकांना त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून इरफान शेख या केंद्र चालकाने सदर बझार पोलिसांत धाव घेतली.

गुन्हा दाखल झाल्यावर एकाने कांबळे याला ‘पोलिस तुला अटक करू शकतात, इथे थांबू नको’ असे सांगितले होते. त्यावेळी कांबळे याने त्या व्यक्तीलाच दमदाटी केली. शिवाय फिर्यादीला देखील त्याने फोन करून दमदाटी केली. त्याने धमकी, दमदाटी केल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कांबळेच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी तो हप्ते वाढवून मागत असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिस उपनिरीक्षक गोविंद पवार तपास करीत आहेत.

रेशन दुकानदारांचाही आरोप

सोलापूरला बाहेरील जिल्ह्यातून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना तो विविध अर्ज करून त्रास देत होता, अशीही बाब तपासात पुढे आली आहे. आता रेशन दुकानदारांनी देखील पोलिसांशी संपर्क साधला असून, कांबळे याने आम्हालाही असाच त्रास दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते उद्या (शनिवारी) पोलिस ठाण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : रांची येथे JPSC-JSSC उमेदवारांचे आंदोलन

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT