A case was registered against the descendants of Saint Namdev Maharaj in Pandharpur 
महाराष्ट्र बातम्या

संत नामदेव महाराजांच्या वंशजांविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेनंतर परंपरेनुसार सहा जुलै रोजी महाद्वार काल्याचा सोहळा झाला होता. त्यावेळी मिरवणूक काढली आणि जमावबंदी आदेशाचे तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज तसेच मदन महाराज हरिदास यांच्यासह पाच जणांविरुद्ध पंढरपूर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. 
दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेनंतर गोपाळकाल्याच्या दुसऱ्या दिवशी महाद्वार काला परंपरेनुसार होत असतो. यंदादेखील प्रथेप्रमाणे आषाढी यात्रेनंतर सहा जुलै रोजी संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांच्या उपस्थितीत महाद्वार काल्याचा सोहळा झाला. महाद्वार काल्याचे जनक कान्हैया हरीदास यांचे विद्यमान वंशज मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर त्यांच्या देवघरातील श्री विठ्ठलाच्या पादुका ठेवून परंपरेप्रमाणे महाद्वार काल्याचा सोहळा झाला होता. 
फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 144 नुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. असे असताना सहा जुलै रोजी दुपारी मदन महाराज हरिदास, श्रीकांत महाराज हरिदास, कांता हरिदास (रा. हरिदास वेस, पंढरपूर), मिलिंद गाताडे (रा. विजापूर गल्ली, पंढरपूर) आणि संत नामदेवांचे वंशज नामदास (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नामदेव मंदिर, पंढरपूर) यांच्यासह इतर सुमारे वीस लोक यांनी जमावबंदी आदेशाचे तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन करून एकत्र जमून महाद्वार काल्याची मिरवणूक काढली. या कारणावरून त्यांच्या विरोधात आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार अरुण राजकर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. वाघमोडे तपास करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT