sameer wankhede esakal
महाराष्ट्र बातम्या

वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरील आरोप खोटे? कागदपत्रं आली समोर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer nawab malik) यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिकांनी वानखेडेंचा जन्माचा दाखल ट्विट केला होता. तसेच 'समीर दाऊद वानखेडे' इथून हा फर्जीवाडा सुरू झाल्याचा आरोप मलिकांनी केला होता. मात्र, आता मलिकांचे आरोप खोटे आहेत काय? असा प्रश्न पडतोय. कारण समीर वानखेडे यांच्या परीवाराचे जात प्रमाणपत्र (caste certificate of sameer wankhede) समोर आले आहे.

समीर वानखेडे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुडतोफा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला समोर आला असून अकोल्यातील न्यू इरा हायस्कूलमध्ये ते शिकत होते. त्यावर ज्ञानदेव कचरूजी वानखेडे, असे त्यांचे नाव लिहिलेले दिसतेय. तसेच त्यांच्या जात प्रमाणपत्रावर देखील अनुसूचित जातीचा उल्लेख केला आहे. यासोबतच त्यांचे नातेवाईक अरविंद दीपक वानखेडे आणि दीपक लक्ष्मण वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र देखील समोर आले आहेत.

समीर वानखेडेंच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
समीर वानखेडेंच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र

जात वंशावळनुसार, ज्ञानबा कचरू वानखेडे, असे समीर यांच्या वडिलांचे नाव, तर कचरू कळणू वानखेडे, असे आजोबांचे नाव असल्याचे दिसत आहे. तसेच आजोबांच्या जन्माच्या कोतवाली नोंदणीमध्ये देखील अनुसूचित जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

वानखेडे कुटुंबीयांची वंशावळ

नवाब मलिक यांचे आरोप काय?

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला ट्विट करत समीर वानखेडे मुस्लीम असल्याचे म्हटले होते. ते मशिदीमध्ये जाऊन भाषण करतात. तसेच ते जन्माने मुस्लीम असून त्यांनी एका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची जागा बळकावली आहे. त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्रावर यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून महसूल विभागात नोकरी मिळविली आहे, असे आरोप मलिकांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT