Caste-Certificate 
महाराष्ट्र बातम्या

जात पडताळणी प्रमाणपत्र हवेच

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणांनी हैराण झालेला आदिवासी विभाग उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाऊ नये यावर ठाम आहे. उच्च शिक्षणासाठी राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रे बनावट असल्याचे गेल्या वर्षी उघडकीस आल्याने जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊ नये यावर विभाग ठाम असल्याने हे प्रकरण कायदा विभागाकडे मार्गदर्शनासाठी पाठविण्यात आले असून, यावर लवकरच निर्णय होणार आहे.

विद्यार्थ्यांनी राखीव जागांद्वारे प्रवेश मिळवितानाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा केंद्राच्या निर्णयावर उच्च शिक्षण विभागाने नाराजी व्यक्‍त करत पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्याबाबत विचार करत आहे. मात्र जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अतिरिक्‍त वेळ अजिबात दिला जाऊ नये, यावर आदिवासी विभाग ठाम आहे.

सीईटीद्वारे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची तयारी आदिवासी विभागाने दाखविली आहे. आदिवासी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले, राखीव जागांवर प्रवेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेच जात नाही. कालांतराने त्यांची जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून येते. मागच्या चार-पाच वर्षांमध्ये शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र बनावट आढळली होती. अशी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातात आणि त्यानंतर ती बनावट आहेत किंवा नाहीत हे ठरते. मात्र जर ती बनावट निघाली, तर त्या जागेवर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याचे नुकसान होते. विशेष करून वैद्यकीय प्रवेशावर याचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेदेखील गेल्या वर्षी एका निकालाद्वारे विद्यार्थ्यांच्या बनावट जात प्रमाणपत्रांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच हमीपत्राद्वारे प्रवेश दिले जाऊ नयेत हे देखील स्पष्ट केलेले आहे याकडेही त्या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

SCROLL FOR NEXT