CBI Sakal
महाराष्ट्र बातम्या

CBI : 100 कोटींमध्ये राज्यसभेची जागा; CBI ने केला टोळीचा पर्दाफाश

आरोपी स्वत:ला सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी म्हणून भासवत होता.

सकाळ डिजिटल टीम

CBI Busts Racket Offering Rajya Sabha Seats : राज्यसभेच्या जागा आणि राज्यपालपदाची खोटी आश्वासने देऊन लोकांना 100 कोटींना चूना लावणाऱ्या रॅकेटचा केंद्रीय अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सीबीआयने एफआयआरमध्ये लातूरचे कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकातील बेळगावचे रवींद्र विठ्ठल नाईक आणि महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि दिल्ली-एनसीआरचे मोहम्मद एजाज खान यांची नावे दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंडगर स्वत:ला सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी म्हणून भासवत होता. एवढेच नाही तर तो उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध लोकांसमोर दाखवत असे. तसेच तो बुरा, अरोरा, खान आणि नाईक यांना लोकांना काम देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा व्यवहार करण्यास सांगत असल्याचेही समोर आले आहे. एवढेच नव्हे तर बड्या नेत्यांच्या जवळ असल्याचे भासवून आरोपी लोकांची दिशाभूल करायचे. मात्र, सीबीआयने त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.

सीबीआयने या प्रकरणात चारहून अधिक जणांना आरोपी केले आहे. महाराष्ट्रातील रहिवासी कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकचा रहिवासी रवींद्र विठ्ठल नाईक, महेंद्र पाल अरोरा आणि दिल्लीचा रहिवासी अभिषेक बुरा अशी यातील काहींची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT