महाराष्ट्र

पुण्याची सुहानी कोरपे राज्यात दहावीत द्वितीय

सकाळवृत्तसेवा

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पुण्यातील चार विद्यार्थी चमकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडाने ९९.४ टक्के गुण मिळवत राज्यात पहिला, तर पुण्यातील सुहानी कोरपे या ‘डीएव्ही पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थिनीने ९९.२ टक्के गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. ती पुण्यातून पहिली आली आहे, तर याच शाळेतील नमन धर्मानी आणि ईशा भट्टाचार्य यांनी ९९ टक्के गुण मिळवत तिसरा तसेच इंदिरा नॅशनल स्कूलच्या ईशिता जिंतूरकर हिनेही राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

पुण्यातील सीबीएसईच्या बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. यात ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा समावेश आहे. स्पृहा सरनाईक हिने शाळेत (९८.२) पहिला, आभा मराठेने दुसरा, रेवती दिवेकर, साक्षी काळे (९७.६) यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे. या शाळेतील २८ विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये १०० गुण मिळाले आहेत. कोथरूड येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलमधील आस्था मुजुमदार (९७.४ टक्के) हिचा शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे.

बालेवाडी येथील भारती विद्यापीठ स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात ईशिता सिन्हा हिने पहिला, चैतन्य कुलकर्णी दुसरा आणि ओम आल्हाट याने तिसरा क्रमांक मिळविला आहे. सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा निकाल सलग पाचव्या वर्षी १०० टक्के लागला आहे. शाळेतील सृष्टी चिंतल (८७ टक्के), आदर्श दोंतुल (८२.८ टक्के) आणि प्रियांका मिसाळ (८२.६ टक्के) यांनी यश मिळविले आहे. 

वानवडीतील सिटी इंटरनॅशनल शाळेने १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील जान्हवी हृषीकेश हिने ९७.४ टक्के गुण मिळवत पहिला, वंदना सुभाषने (९६.६) दुसरा आणि चेहक आगरवालने (९६) तिसरा क्रमांक मिळविला आहे. गोयलगंगा इंटरनॅशनल स्कूलमधील सर्व ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आदित्य खानोलकरने (९६.६ टक्के) पहिला, कार्तिक श्रीनिवासन आणि आयुषी सिंग (९६.२) यांनी दुसरा, तर निभा गुप्ता आणि सुहानी भंडारी (९६) यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे. इंदिरा नॅशनल स्कूलमधील ईशिता जिंतूरकर हिने ९९ टक्के गुण मिळवत पहिला, नील हंडाने (९८.४) दुसरा, जॉन मायकेल आणि जील झिंजुवाडिया यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे. 

निगडी येथील सिटी प्राइड स्कूलनेही निकालाची शंभरी गाठली आहे. शाळेतील साकेत ढोरे याने ९७.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. भुकूम येथील संस्कृती स्कूलच्या यशाची परंपरा कायम आहे. या शाळेतील विदुषी टंडन (९८.२) हिने पहिला, दिशा लवेकर (९८ टक्के) हिने दुसरा, नेहा मुंगळे आणि अर्वसू कुलकर्णी (९७.६ टक्के) यांनी शाळेत तिसरा क्रमांक मिळविला. केशवनगरमधील ऑरबिस प्रशालेमध्ये कवाना अंकलेकर हिने (९६.६ टक्के) पहिला, अक्षित वशिष्ट, वृष्टी शहाने (९५.२) दुसरा, संयोगिता सरीन (९५ टक्के) आणि कृती गुप्ता (९५ टक्के) यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे.

दहावीच्या प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव केला. त्यामुळे मला आत्मविश्‍वास आला. रोज पाच-सहा तास अभ्यास केला. त्यापेक्षाही विषयांमधील संकल्पना समजून घेण्यावर भर दिला, त्याचा मला फायदा झाला. मला डॉक्‍टर, इंजिनिअर व्हायचे नाही, मूलभूत संशोधन क्षेत्रात जायचे आहे.
- सुहानी कोरपे, राज्यात द्वितीय

शाळा, क्‍लास असले तरी माझा स्वयंअध्ययनावर भर राहिला. अभ्यासात अडचण आली की शाळेतील शिक्षकांनी खूप मदत केली. दररोज दोन-अडीच तास अभ्यास केला, त्यात सातत्य ठेवले. मला पुढे अभियांत्रिकी शाखेकडे जायचे आहे.
- नमन धर्मानी 

दहावीच्या निकालात ज्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली, ते सुरवातीपासूनच डीएव्हीमध्ये होते. शिक्षकांनी प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव त्यांच्याकडून करून घेतला. या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यशाबद्दल त्यांचे अभिनंदन.
- सी. व्ही. माधवी,  मुख्याध्यापक, डीएव्ही पब्लिक स्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT