CCTNS
CCTNS 
महाराष्ट्र

‘सीसीटीएनएस’ प्रणाली देशात प्रथम

सकाळवृत्तसेवा

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या परिषदेत महाराष्ट्र पोलिसांचा गौरव
पुणे - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या वतीने (एनसीआरबी) नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन परिषदेत महाराष्ट्र पोलिसांच्या ‘क्राइम ॲण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम’ (सीसीटीएनएस) प्रणालीस शोध वर्गवारीमध्ये प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट प्रणाली वापराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.  

‘एनसीआरबी’तर्फे दिल्ली येथे ऑनलाइन पद्धतीने ‘गुड प्रॅक्‍टिसेस इन क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टिम (सीसीटीएनएस) आणि इन्ट्रोपोरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टिम (आयसीजेएस) परिषद घेण्यात आली. यात ‘सीसीटीएनएस’ या शोध वर्गवारीमध्ये देशातील अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील पोलिस दलांच्यावतीने त्यांचे विविध उपक्रम समाविष्ट होते. त्यामधील शोध वर्गवारीमध्ये महाराष्ट्र पोलिसांची प्रणाली देशात सर्वोत्कृष्ट ठरली. त्याबाबतची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके, पोलिस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक संभाजी कदम, अपर पोलिस अधीक्षक नंदा पाराजे, पोलिस उपअधीक्षक जितेंद्र कदम, चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक प्रशांत पांडे, शशिकला काकरे, प्रमोद जाधव यांच्या या प्रणालीसाठी विशेष काम केले.

उघडकीस आलेले गुन्हे

  • ७४३ चोरीला गेलेल्या मालमत्ता
  • ६९३ हरवलेल्या, बेवारस मृत व्यक्तींचा शोध
  • ७ हजार ८८३ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई (५०७ प्रकरणांमध्ये जामीन फेटाळले)
  • १३ हजार  ७२१ व्यक्तींची पडताळणी
  • ४ हजार ६०१ इतक्‍या व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल.
  • १ लाख १७ हजार २६ पारपत्र व चारित्र्य पडताळणी प्रकरणांमध्ये २ हजार ८३७ गुन्हे दाखल झाले असल्याचे निष्पन्न.

काय आहे प्रणाली?
विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासामधील गुन्हे प्रकटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे यासाठी या प्रणालीची मदत होते. या प्रणालीमध्ये देशपातळीवरील गुन्हे व गुन्हेगारांची माहिती, गुन्हे प्रकटीकरण, गुन्हेगारांचा कार्यपद्धतीप्रमाणे शोध, शस्त्र परवाना, तसेच तपासामध्ये गुन्ह्यांची सद्यःस्थिती इत्यादी माहिती अद्ययावत करण्यात येते. गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई, पारपत्र, वाहनांबाबतच्या पोलिस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणी अशा माहितीचाही प्रणालीमध्ये समावेश आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT