solapur police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सीसीटीव्ही अंधूक, तरी सोलापूर पोलिसांनी चोरट्याला त्याच्या चालण्यावरून शोधले! १४ लाखांचे दागिने घेणारा मानलेला मामा जेरबंद; दागिना विकून घेतला ४० हजारांचा मोबाईल

भंगार चोरणाऱ्या अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकाने अंत्रोळीकर नगर भाग-३ येथील खूप दिवसांपासून बंद असलेल्या घरातून १४ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरले होते. चोरीचे दागिने त्याने मानलेल्या मामाकडे दिले आणि ते माझ्याच घरातील असल्याचे सांगितले. मामानेही दागिने ठेवून घेतले. विजापूर नाका पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले.

तात्या लांडगे

सोलापूर : भंगार चोरणाऱ्या अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकाने अंत्रोळीकर नगर भाग-३ येथील खूप दिवसांपासून बंद असलेल्या घरातून १४ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरले होते. चोरीचे दागिने त्याने मानलेल्या मामाकडे दिले आणि ते माझ्याच घरातील असल्याचे सांगितले. मामानेही दागिने ठेवून घेतले. विजापूर नाका पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. मानलेला मामा अंकित ऊर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मीकी (वय ३४, रा. जुना बाजार खडकी, पुणे) याला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

फिर्यादी रवी दौलताबाद हे विवाहानिमित्त अडीच महिने पुण्याला गेले होते. जाताना त्यांनी सोलापुरातील घर कुलूपबंद केले होते. विवाहावरून घरी आल्यावर दागिने चोरीला गेल्याचे समजले आणि त्यांनी ५ फेब्रुवारीला विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली. विजापूर नाका पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. त्यासाठी पोलिसांनी तब्बल ६९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. दुसरीकडे खबऱ्यांमार्फतही चोरट्याचा शोध सुरू होता. फुटेज पडताळणीनंतर विधीसंघर्षग्रस्त बालकाने २ फेब्रुवारीला चोरी केल्याचे पोलिसांना समजले. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण त्याची चाल लक्ष जाईल अशी होती. दरम्यान, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि विचारपूस केली. त्याने चोरीचे दागिने मामाकडे ठेवायला दिल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याचा मानलेला मामा अंकुश वाल्मीकी याला पकडले. त्याने दागिने दिले, पण त्यात चार बांगड्या कमी होत्या. आता पोलिसांनी अंकुशला पुण्याला नेले असून त्याच्या घराची झडती घेतली जाणार आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.

सीसीटीव्हीत चेहरा अंधूक, चालण्यावरुन पटवली ओळख

होटगी रोडवरील अंत्रोळीकर नगर भाग-३ येथील रवी प्रकाश दौलताबाद यांच्या घरातून चोरट्याने १४ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. २५ नोव्हेंबर २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२६ या काळात चोरी झाल्याची फिर्याद दौलताबाद यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यात संशयिताचा चेहरा अंधूक दिसत होता. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील देखील नव्हता. पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले आणि सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताची चाल आणि पारशी विहीर परिसरातील अंबिका नगरातील एका अल्पवयीन मुलाची चाल यात साम्य आढळले. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि चोरीचा उलगडा झाला.

अंगावरील कपडे जाळले, पण..

साडेचौदा लाखांचे दागिने चोरलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने आपण पोलिसांना सापडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. त्याने त्या दिवशी घातलेला टी-शर्ट, पॅन्ट जाळून टाकली होती, अशीही माहिती तपासात समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT