Bullock Cart Race
Bullock Cart Race esakal
महाराष्ट्र

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली; साताऱ्यातील पुसेगावात जल्लोष

ऋषिकेश पवार

सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यानं पुसेगावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

विसापूर : सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) बैलगाडी शर्यतीवरील (Bullock Cart Race) बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यानं पुसेगावमध्ये (Pusegaon) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडी शर्यत शौकीन व शेतकर्‍यांनी पुसेगावमधील चौका-चौकात हालगीच्या कड-कडाडात, गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या धुमधडाक्यात जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं.

ग्रामीण परंपरेचा भाग असलेल्या यात्रा-जत्रा, उरूस अशा धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक सोहळ्यातील आकर्षण असलेल्या बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली गेल्याने शर्यत शौकीन व शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती. बैलगाडी शर्यतीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुरुवार (दि. 16) सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठानं महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला काही अटींवर परवानगी दिलीय. यामुळं राज्यातील बैलगाडी मालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा सर्ज्या-राज्यांच्या शर्यतींचा धुरळा उडणार आहे.

पुसेगावसह पंचक्रोशीतील बैलगाडी मालक-चालक, तसेच शेतकर्‍यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न केले होते. याकामी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा गोवा राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यावर बैलगाडी शर्यत शौकिनांनी पुसेगावामध्ये जल्लोष केला. यावेळी पुसेगावमधील छत्रपती शिवाजी चौक ते श्री सेवगिरी मंदिरापर्यंत बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विजय जाधव, राहुल जाधव, तानाजी वलेकर, प्रताप झांजुर्णे, पिंटू मदने, विजय भोसले, दादा घाडगे, विकास जाधव, सुजित जगदाळे, अनिल काटकर, शंकर पैलवान यांसह अनेक शेतकरी, बैलगाडी मालक-चालक व शौकीन सहभागी झाले होते.

अनेक वर्षांपासून ग्रामीण परंपरेचा भाग असलेल्या यात्रा-जत्रा, उरूस यामधील बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्याने ग्रामीण संस्कृती नष्ट होते, की काय अशी भीती वाटत होती. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा मालकांची बाजू ताकदीने मांडल्याने बैलगाडी शर्यत शौकिनांना न्याय मिळाला आहे.

-विजय जाधव, बैलगाडी मालक, पुसेगाव

बैलगाडा शर्यतबंदीचा मोठा आर्थिक फटका जनावरे उपयोगी वस्तू विक्रेते, वडापाव, भेळ, आईस्क्रीम, रसवंती गृह, पाणी व खेळणी विक्रेते, वाहतूक व्यावसायिक या छोट्या व्यावसायिकांना बसत होता. शेतकर्‍यांचे अर्थकारण देखील बर्‍यापैकी खिल्लार जनावरांवर अवलंबून असते. बंदी उठल्यामुळे शेतकार्‍यांसोबतच आम्हा व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

-रमेश बोडके, जनावरे उपयोगी वस्तू विक्रेते, पुसेगाव

बैलगाडी शर्यती बंद असल्यामुळे भारतीय बैल असलेल्या खिल्लार जातींच्या बैलांची संख्या ही फार कमी होत चालली होती. ही परिस्थिती अशीच राहिली असती तर, या बैलांच्या जाती संपुष्टात येवून नामषेश होण्याचा धोका निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जातिवंत खिल्लार बैलांना बाजारात मोठी मागणी होऊन शेतकर्‍यांचे अर्थकारण मजबूत होण्यास मदत होईल.

-प्रकाश जाधव, प्रगतशील शेतकरी पुसेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT