Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या शिवसेनेला फक्त 97 मतं; फडणवीसांनी उडवली खिल्ली

सकाळ डिजिटल टीम

'चार राज्यांच्या निकालानंतर मोदीजींची जादू आपण पाहिलीच, त्यामुळं मोदी है तो मुनकिन है!'

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांच्या (Election Result) निकालानंतर मोदीजींची जादू आपण पाहिलीच, त्यामुळं मोदी है तो मुमकिन है! निवडणुकीत दुसऱ्या सेनेचं (शिवसेना) Shiv Sena काय झालं? आपण तेही पाहिलं आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात जावून शिवसेनेनं आवाहन दिलं होतं. पण, तिथं शिवसेनेला फक्त ९७ मतं मिळाली आहेत. ही भाजपची (BJP) ताकद आहे, असं स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चार राज्यांच्या विजयानंतर व्यक्ती केलं. ते मुंबईत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, आम्ही कोणत्याही पक्षाविरोधात नाही, तर भ्रष्टाचाराविरोधात आमचा लढा सुरुय. चार राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालंय. ही मोदीजींची खऱ्या अर्थानं ताकद आहे. दादांनी गोव्यात जी सेना (भाजप) पाठवली, त्या सेननं दुसऱ्या सेनेला त्यांची किंमत दाखवून दिलीय. उत्तरप्रदेशमध्ये सपासह विरोधी पक्षांचा सुपडासाफ झालं आहे, त्यामुळं मोदींवर जनतेचा विश्वास दिसून येत आहे.

सध्या कुठल्याही लढाईनं हुरळून न जाता ही लढाई अशीच सुरु ठेवायला हवी. या विजयाबद्दल महाराष्ट्रातील तमाम आमदार-खासदार, कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण, त्यांनी घेतलेल्या कष्टामुळंच हा भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळं मोदींवर कितीही टीका केली, तरी त्यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास कायम आहे. तसेच आज विजयाचा आनंद घ्या आणि उद्यापासून कामाला लागा, असे स्पष्ट संकेतही फडणवीस यांनी शेवटी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Motegavkar Son Inquiry : नीट पेपरफुटी प्रकरण; शिवराज मोटेगावकरच्या मुलाची CBI चौकशी, आणखी तीन विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात

Electricity Rate: वीज ग्राहकांना मोठा दिलासा! वीजदरात कपात; दिवसा वीज वापरणे स्वस्त होणार, किती दर कमी केले?

NEET पेपरफुटीचं प्रकरण; पुण्यानंतर सीबीआयचं पथक नागपुरात, तीन विद्यार्थ्यांची झाडाझडती़, मोठा मासा गळाला लागणार?

Viral Video: 'अरे हा किती म्हातारा दिसतोय' गोविंदाचं वाढलेलं वय आणि पडलेले दात पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT